Toyota Avanza: टोयोटा स्वस्तातली मिनी इनोव्हा आणतेय; सात सीटर अन् किया कॅरेन्स, मारुती अर्टिगाला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2022 09:36 AM2022-10-30T09:36:34+5:302022-10-30T09:36:59+5:30

Toyota Avanza MPV Launch India: किया, मारुती, सुझुकी, रेनॉ आदी कंपन्यांच्या या सात सीटर कार आहेत. यापैकी किया, मारुतीच्या कारना मोठी मागणी आहे. टोयोटाची इनोव्हा ही २० लाखांच्या आसपास जाते, यामुळे परवडणाऱ्या किंमतीत एक कार उतरविण्याच्या तयारीत कंपनी आहे. 

Toyota Avanza: Toyota Launches Affordable Mini Innova; The seven seater and Kia Carens will rival the Maruti Ertiga | Toyota Avanza: टोयोटा स्वस्तातली मिनी इनोव्हा आणतेय; सात सीटर अन् किया कॅरेन्स, मारुती अर्टिगाला टक्कर देणार

Toyota Avanza: टोयोटा स्वस्तातली मिनी इनोव्हा आणतेय; सात सीटर अन् किया कॅरेन्स, मारुती अर्टिगाला टक्कर देणार

googlenewsNext

जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटा मोटर्स लवकरच मिनी इनोव्हा आणण्याच्या तयारीत आहे. या एमपीव्ही कारचा लूक इनोव्हासारखाच असून ती अन्य कारच्या तुलनेत स्वस्त देखील असणार आहे. ही कार सात सीटर असणार आहे. 

टोयोटा येत्या काळात अवांझा ही एमपीव्ही आणणार आहे. ११ वर्षांपूर्वी कंपनीने ही कार भारतीय बाजारात आणली होती. परंतू, मागणी कमी असल्याने ती बंद करण्यात आली होती. आता भारतात ७ सीटर कारला चांगली मागणी वाढली आहे. किया, मारुती, सुझुकी, रेनॉ आदी कंपन्यांच्या या सात सीटर कार आहेत. यापैकी किया, मारुतीच्या कारना मोठी मागणी आहे. टोयोटाची इनोव्हा ही २० लाखांच्या आसपास जाते, यामुळे परवडणाऱ्या किंमतीत एक कार उतरविण्याच्या तयारीत कंपनी आहे. 

Toyota Avanza मध्ये 1.0 लीटर 3 सिलेंडर टर्बोचार्ज्ड पेट्रोल इंजिन मिळेल. याची पावर 98 PS आणि 140 न्यूटन टॉर्क जनरेट करेल. तसेच Avanza 1.2 लीटर नैसर्गिकरित्या एस्पिरेटेड पेट्रोल इंजिनसह देखील पर्याय असू शकतो. या कारमध्ये अडास ही सिस्टिमदेखील असू शकते. क्रूझ कंट्रोल आणि लेन असिस्टसह अनेक वैशिष्ट्ये असू शकतात. 

Avanza मध्ये मोठी केबिन स्पेस, लांब व्हीलबेस, नवीन फ्रंट लुक, स्लिम एलईडी हेडलॅम्प्स सोबत 9-इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टीम, Android Auto आणि Apple कार प्ले सपोर्ट, मल्टी-फंक्शनल स्टीयरिंग व्हील, अॅम्बियंट लाइटिंग, डिजिटल इन्स्ट्रुमेंट कन्सोल दिला जाऊ शकतो. स्टार्ट-स्टॉप बटण, यूएसबी चार्जिंग पोर्ट, पार्किंग कॅमेरा, इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक आदी सुविधादेखील दिल्या जाऊ शकतात. 

Web Title: Toyota Avanza: Toyota Launches Affordable Mini Innova; The seven seater and Kia Carens will rival the Maruti Ertiga

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Toyotaटोयोटा