Toyota bZ4X Electric SUV India Launch : मारुतीची नाही, पण बलाढ्य मित्राची इलेक्ट्रीक एसयुव्ही येणार; टाटा, ह्युंदाई, कियाला टक्कर देणार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2023 11:52 AM2023-04-06T11:52:01+5:302023-04-06T11:56:38+5:30

मुंबई-पुणे-मुंबई पुन्हा पुणे एकाच चार्जमध्ये... या सिरीजमध्ये येत्या काळात आणखी इलेक्ट्रीक कार येतील. टोयोटाच्या या कारचे नाव जपानी ब्रँड बियाँड झिरोच्या नावावर ठेवण्यात आले आहे.

Toyota bZ4X Electric SUV India Launch : Electric SUV will come not from Maruti, but from a world biggest friend; Will compete with Tata, Hyundai, Kia | Toyota bZ4X Electric SUV India Launch : मारुतीची नाही, पण बलाढ्य मित्राची इलेक्ट्रीक एसयुव्ही येणार; टाटा, ह्युंदाई, कियाला टक्कर देणार

Toyota bZ4X Electric SUV India Launch : मारुतीची नाही, पण बलाढ्य मित्राची इलेक्ट्रीक एसयुव्ही येणार; टाटा, ह्युंदाई, कियाला टक्कर देणार

googlenewsNext

भारतीय बाजारात आता इलेक्ट्रीक कार येण्यास सुरुवात झाली आहे. या मार्केटमध्ये टाटाने बाजी मारलेली आहे. तरी अद्याप मारुतीची एन्ट्री झालेली नाहीय. असे असले तरी भारतात मारुतीची मित्र बनलेली कंपनी जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटा ईलेक्ट्रीक कार आणणार आहे. 

कियाची ईव्ही 6 आता रस्त्यावर धावणार; या तारखेपासून बुकिंग सुरु करण्याची केली घोषणा

सारे काही ठीक राहिले तर टोयोटा किर्लोस्कर मोटर इंडिया बीझेड4एक्स एसयुव्ही भारतात लाँच करणार आहे. जानेवारीतील ऑटो एक्स्पोमध्ये टोयोटाने ही इलेक्ट्रीक कार शोकेस केली होती. किया, ह्युंदाईसह टाटाच्या येणाऱ्या इलेक्ट्रीक एसयुव्हींना ही कार टक्कर देणार आहे. 

टोयोटाच्या या कारचे नाव जपानी ब्रँड बियाँड झिरोच्या नावावर ठेवण्यात आले आहे. या सिरीजमध्ये येत्या काळात आणखी इलेक्ट्रीक कार येतील. याचे डिझाईन स्पोर्टी आहे. ऑल एलईडी सेटअपसोबत आकर्षक एक्स्टीरिअर देण्यात आले आहे. यामध्ये मोठी स्क्रीन, कंफर्टेबल सीट्स आणि सर्व आवश्यक सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. 

Toyota bZ4X मध्ये पावरफुल 71.4kWh चे बॅटरी पॅक दिले आहे. एका चार्जवर ही कार ५०० किमीचे अंतर कापू शकते. ही कार फ्रंट आणि ऑल व्हील ड्राईव्ह ऑप्शनमध्ये आणली जाईल. यामुळे दोन्ही ऑप्शनची रेंज वेगवेगळी असणार आहे. यामध्ये पावर बूस्ट मोडही असेल. यात ही कार 218hp ताकद आणि 336Nm पिक टॉर्क जनरेट करते. 

मीडिया रिपोर्टनुसार 7.7 सेकंदांत ही कार 0-100kmph चा वेग पकडते. ही कार ३० मिनिटांत ८० टक्के चार्ज होऊ शकते. याकारची किंमत ४० ते ५० लाखांच्या आसपास असू शकते. 

Web Title: Toyota bZ4X Electric SUV India Launch : Electric SUV will come not from Maruti, but from a world biggest friend; Will compete with Tata, Hyundai, Kia

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.