टोयोटाने 'या' गाड्यांच्या किमती वाढवल्या, आता खर्च करावे लागतील 77 हजार रुपये जास्त
By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2022 08:41 AM2022-10-03T08:41:13+5:302022-10-03T08:41:56+5:30
Toyota Fortuner, Innova Price : किमती वाढल्यानंतर इनोव्हा क्रिस्टाच्या GX MT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत 17.45 लाख रुपये आहे.
नवी दिल्ली : टोयोटाच्या (Toyota) एसयूव्हीची भारतीय बाजारपेठेत मजबूत पकड आहे. यात इनोव्हा क्रिस्टा (Innova Crysta) आणि फॉर्च्युनरची (Fortuner)बरीच विक्री आहे. मात्र आता कंपनीने या वाहनांच्या किमती वाढवल्या आहेत. यामध्ये इनोव्हा क्रिस्टाच्या किमतीत 23,000 रुपयांनी आणि फॉर्च्युनरच्या किमतीत 77,000 रुपयांनी वाढ झाली आहे.
Innova Crysta ची किंमत
किमती वाढल्यानंतर इनोव्हा क्रिस्टाच्या GX MT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत 17.45 लाख रुपये आहे, तर त्याच्या टॉप-एंड व्हेरिएंट ZX AT 7-सीटरची एक्स-शोरूम किंमत आता 23.83 लाख रुपये झाली आहे. दुसरीकडे, इनोव्हा क्रिस्टाची डिझेल व्हर्जन आता 19.13 लाख ते 26.77 लाख रुपयांच्या एक्स-शोरूम किमतीत उपलब्ध आहे.
Fortuner ची किंमत
किमतीत वाढ झाल्यानंतर टोयोटा फॉर्च्युनरच्या 2.7L पेट्रोल 4X2 मॅन्युअल ट्रान्समिशन, 7-सीटर व्हेरिएंटची किंमत 32.59 लाख रुपये आणि त्याच मॉडेलच्या ऑटोमॅटिक ट्रान्समिशन व्हेरिएंटची किंमत 34.18 लाख रुपये झाली आहे. तसेच, टोयोटा फॉर्च्युनरची 4X2 मॅन्युअल ट्रान्समिशन, डिझेल व्हेरिएंटची किंमत 35.09 लाख रुपये आणि 4X2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन आहे, तर डिझेल व्हेरिएंटची किंमत 37.37 लाख रुपये आहे. त्याच्या डिझेल इंजिनसह 4X4 मॅन्युअल व्हेरिएंटची किंमत आता 38.93 लाख रुपये आहे आणि त्याच्या ऑटोमॅटिक व्हेरिएंटची किंमत आता 41.22 लाख रुपये झाली आहे.
Fortuner Legender ची नवीन किंमत
फॉर्च्युनर लिजेंडरची (Fortuner Legender) 4X2 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 4X4 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन, 4X4 ऑटोमॅटिक ट्रान्समिशन जीआर स्पोर्टच्या किंमतीत 77 हजार रुपयांनी वाढ करण्यात आली आहे, आता त्यांची नवीन किंमत अनुक्रमे 42.82 लाख, 46.54 लाख आणि 50.34 लाख रुपये झाली आहे.
कॅमरी आणि वेलफायरच्या किमतीही वाढल्या
टोयोटाने आपल्या सेडान आणि एमपीव्ही सेगमेंट कारची किंमत 90,000 रुपयांवरून 1,85,000 रुपयांपर्यंत वाढवली आहे. या वाढीनंतर कॅमरी हायब्रिडची किंमत आता 45.25 लाख रुपयांवर गेली आहे आणि वेलफायर हायब्रिडची नवीन किंमत 94,45,000 रुपयांवर गेली आहे.