मोठा Sunroof अन् आकर्षक फिचर्स! सीटवर बसल्या बसल्या पाहा आकाश, येतेय नवी Innova Hycross

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2022 09:20 AM2022-11-16T09:20:30+5:302022-11-16T09:21:36+5:30

Toyota Innova Hycross Launch Details: टोयोटा कंपनी आपल्या लोकप्रिय एमवीपी Innova कारला आता पूर्णपणे नव्या अवतारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे.

toyota innova hycross to be launch with panoramic sunroof and advance features | मोठा Sunroof अन् आकर्षक फिचर्स! सीटवर बसल्या बसल्या पाहा आकाश, येतेय नवी Innova Hycross

मोठा Sunroof अन् आकर्षक फिचर्स! सीटवर बसल्या बसल्या पाहा आकाश, येतेय नवी Innova Hycross

Next

Toyota Innova Hycross Launch Details: टोयोटा कंपनी आपल्या लोकप्रिय एमवीपी Innova कारला आता पूर्णपणे नव्या अवतारात लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. कंपनीनं नुकतंच आपल्या नव्या Innova Zenix चे काही टीझर लॉन्च केले होते. या कारची वैशिष्ट्ये देखील समोर आली आहे. आता हिच कार भारतीय बाजारपेठेत Innova Hycross नावानं सादर केली जाण्याची दाट शक्यता आहे. कंपनीनं आगामी हायक्रॉसचा एक टिझर देखील लॉन्च केला. यातून नवी इनोवा कार पॅनारोमिक सनरुफसह लॉन्च होणार असल्याचं दिसून येत आहे. 

रिपोर्टनुसार, इनोव्हा हायक्रॉस २१ नोव्हेंबर रोजी इंडोनेशियाच्या बाजारात लॉन्च केली जाणार आहे. त्यानंतर २५ नोव्हेंबर रोजी भारतीय बाजारात लॉन्च होईल. टोयोटा इंडोनेशियाच्या अधिकृत ट्विटर हँडलवर नव्या इनोवाचा टिझर प्रदर्शित करण्यात आला आहे. यात मोठ्या आकाराचं पॅनारोमिक सनरुफ पाहायला मिळत आहे. टोयोटा इनोवामध्ये सनरुफ ऑफर केलं जाण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. याआधी कंपनीनं Innova Crysta मध्ये स्टँडर्ड साइज सनरुफ दिलं होतं. तर फर्स्ट जनरेशन मॉडलमध्येही सनरुफ नव्हतं. 

Toyota Innova Hycross मध्ये कार असणार खास
लॉन्चची तारीख जवळ येतेय तसं तसं या कार संबंधी नवी माहिती देखील दिली जात आहे. नव्या इनोवामध्ये कंपनी सनरुफसोबतच तिसऱ्या रांगेतील पॅसेंजर्ससाठी एक डेडिकेटेड AC वेंट देखील दिलं जाणार आहे. यामुळे कारमध्ये आता थर्ड रो पेसेंजर्सना देखील कूलिंगची सुविधा मिळणार आहे. कारच्या इंटेरिअरला आणखी रॉयल करण्यासाठी यात एम्बीएंट लायटिंग देण्यात आली आहे. 

टोयोटा हायक्रॉस कंपनी २.० लीटर नॅचरल एस्पायर्ड पेट्रोल इंजिनला हायब्रिड तंत्रज्ञानासह सादर करण्याची शक्यता आहे. टोयोटा कंपनीनं या कारचा एक एक्स्टीरिअर लूक देखील समोर आणला आहे. यातून नव्या इनोवाला स्पोर्टी लूक देण्याचा प्रयत्न कंपनीकडून करण्यात आल्याचं दिसून येतं. 

फिचर्स कोणते मिळतील?
नुकतंच इनोवा हायक्रॉसच्या इंटेरिअरचे काही फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. व्हायरल फोटोंनुसार कारमध्ये मल्टी-लेयर्ड डॅशबोर्ड आणि नव्या डिझाइनसह सेंटर कन्सोल पाहायला मिळणार आहे. कंपनीच्या लेटेस्ट जनरेशन Voxy एमपीवीच्या धर्तीवर नवे बदल केले जाऊ शकतात. याशिवाय मोठा टचस्क्रीन इन्फोटेंमेंट सिस्टम, क्लायमेट कंट्रोल, टच सेन्सिटीव्ह HVAC कंट्रोल, 360-डिग्री कॅमेरा आणि सेकंड रो कॅप्टन सीट्स इत्यादी फिचर्स पाहायला मिळू शकतात. 

लॉन्च केव्हा अन् किंमत किती?
इनोवा हायक्रॉस भारतीय बाजारात २५ नोव्हेंबर रोजी लॉन्च केली जाण्याची शक्यता आहे. तसंच कंपनी आगामी ऑटो एक्स्पो-२०२३ मध्ये या कारच्या किमतीची घोषणा करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. कारची अंदाजित किंमत सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या मॉडलपेक्षा थोडी अधिक असू शकते. यासाठी कारच्या लॉन्चिंगची वाट पाहावी लागणार आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Toyota Innova Crysta ची किंमत १८.०९ लाख रुपयांपासून सुरू होते. तर या कारचं टॉप मॉडलची किंमत २३.८३ लाख रुपये इतकी आहे.

Web Title: toyota innova hycross to be launch with panoramic sunroof and advance features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.