'ही' कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी, वेटिंग पीरियड वाढला, कंपनीला थांबवावे लागले बुकिंग! 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 13, 2023 04:54 PM2023-04-13T16:54:29+5:302023-04-13T16:55:06+5:30

टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट बुकिंगसाठी प्रतीक्षा कालावधी 26 महिन्यांपर्यंत वाढला आहे

toyota innova hycross waiting period upto 26 months bookings closed for top spec variant | 'ही' कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी, वेटिंग पीरियड वाढला, कंपनीला थांबवावे लागले बुकिंग! 

'ही' कार खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी, वेटिंग पीरियड वाढला, कंपनीला थांबवावे लागले बुकिंग! 

googlenewsNext

नवी दिल्ली : टोयोटाने काही काळापूर्वी आपल्या लोकप्रिय एमपीव्ही इनोव्हाचे हायक्रॉस व्हर्जन (Toyota Innova Hycross)  लाँच केले होते.  हे मॉडेल लाँच होताच हिट झाले.  या मॉडेलची लोकप्रियता एवढी आहे की, जर तुम्ही ते आजच बुक केले तर तुम्हाला 2025 मध्ये डिलिव्हरी मिळेल. या कारच्या टॉप स्पेस व्हेरिएंटची मागणी इतकी जास्त आहे की, कंपनीने तिची बुकिंग थांबवली आहे.  मात्र, प्रतीक्षा कालावधी वाढण्याचे एक कारण म्हणजे सप्लाय चेनमधील व्यत्यय असल्याचेही सांगितले जाते.

टॉप व्हेरिएंटसाठी 26 महिने प्रतीक्षा कालावधी
टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट बुकिंगसाठी प्रतीक्षा कालावधी 26 महिन्यांपर्यंत वाढला आहे. शिवाय, नॉन-हायब्रीड पेट्रोल व्हेरिएंटलाही सहा ते सात महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी आहे. इनोव्हा हायक्रॉस दोन पॉवरट्रेन पर्यायांसह येते. पहिला पर्याय म्हणजे शुद्ध पेट्रोल पॉवरट्रेन जे 173 Bhp आणि 209 Nm टॉर्क निर्माण करणारे 2.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरते. दरम्यान, इतर ड्राइव्हट्रेन पर्याय देखील 2.0-लिटर पेट्रोल इंजिन वापरतो, परंतु हायब्रिड सेटअपसह येतो आणि जास्तीत जास्त 184 Bhp आणि 188 Nm टॉर्क निर्माण करतो.

वॉरंटी
स्टँडर्ड पेट्रोल व्हर्जन सीव्हीटी ट्रान्समिशनसोबत जोडले आहे. तसेच, मजबूत हायब्रिड व्हर्जन ई-सीव्हीटी गिअरबॉक्सशी जोडले आहे.  टोयोटा इनोव्हा हायक्रॉससह मॅन्युअल गिअरबॉक्स देत नाही. दरम्यान, टोयोटा अजूनही बाजारात इनोव्हा क्रिस्टा डिझेल देते.  इनोव्हा क्रिस्टा डिझेल नुकतेच बाजारात पुन्हा लाँच करण्यात आले आणि ते केवळ मॅन्युअल ट्रान्समिशनसह उपलब्ध आहे.  टोयोटा हायब्रीड बॅटरीवर 3 वर्षे/100,000 किलोमीटरची वॉरंटी आणि 5 वर्षे/220,000 किलोमीटर विस्तारित वॉरंटी, 3 वर्षे फ्री रोडसाइड असिस्टेंस, शानदार स्कीम्स आणि 8 वर्षे/160,000 किलोमीटर वॉरंटीचा पर्याय देत आहे.

6 व्हेरिएंटमध्ये उपलब्ध
G, GX, VX, VX(O), ZX आणि ZX(O) या टोयोटा 6 व्हेरिएंटमध्ये इनोव्हा हायक्रॉस ऑफर करते.  ZX आणि ZX(O) वगळता, या सर्व व्हेरिएंट 7 आणि 8-सीटर कॉन्फिगरेशनसह ऑफर केल्या आहेत. दरम्यान, हे दोन टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिएंट फक्त सात-सीटर कॉन्फिगरेशनमध्ये येतात.  टोयोटा इनोव्हा हायक्रॉस सुपर व्हाईट, प्लॅटिनम व्हाईट पर्ल, सिल्वर मेटॅलिक, अॅटिट्यूड ब्लॅक मीका, स्पार्कलिंग ब्लॅक पर्ल क्रिस्टल शाईन, ग्रेडेड ब्रॉन्झ मेटॅलिक आणि ब्लॅकिश ग्लास फ्लेकमध्ये उपलब्ध आहे.  टोयोटा इनोव्हा हायक्रॉस टोयोटा न्यू ग्लोबल आर्किटेक्चर (TNGA) वर आधारित आहे.  ही एक मोनोकॉक एमपीव्ही आहे तर इनोव्हा क्रिस्टा एक लॅडर-ऑन-फ्रेम एमपीव्ही आहे.

फीचर्स
इनोव्हा हायक्रॉस लूक आणि फीचर्सच्या बाबतीत इनोव्हा क्रिस्टापेक्षा खूपच प्रीमियम दिसते.  टोयोटा इनोव्हा हायक्रॉस फ्लोटिंग 10-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, लेदर अपहोल्स्ट्री, फ्रंट व्हेंटिलेटेड सीट्स, अॅम्बियंट लाइट्स, पॅनोरॅमिक सनरूफ, मल्टी-फंक्शन स्टीयरिंग व्हील यांसारखी फीचर्स ऑफर करते.

Web Title: toyota innova hycross waiting period upto 26 months bookings closed for top spec variant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.