शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे ही ढासू SUV, देण्यात आले आहे ग्रेनेड लॉन्चर अन् ड्रोन इंटरसेप्टर; जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2022 01:36 PM2022-09-27T13:36:51+5:302022-09-27T13:37:30+5:30

Armoured Toyota Land Cruiser: ही Toyota Land Cruiser Armoured ऑफ-रोडिंगसाठी सक्षम आहे. या गाडीत ऑफ-रोड मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी फ्लॅटबेडही देण्यात आला आहे.

Toyota Land Cruiser Armoured with drone interceptor and grenade launcher Know about the specialty | शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे ही ढासू SUV, देण्यात आले आहे ग्रेनेड लॉन्चर अन् ड्रोन इंटरसेप्टर; जाणून घ्या खासियत

शस्त्रास्त्रांनी सुसज्ज आहे ही ढासू SUV, देण्यात आले आहे ग्रेनेड लॉन्चर अन् ड्रोन इंटरसेप्टर; जाणून घ्या खासियत

googlenewsNext


आपण व्हीआयपी वाहतुकीसाठी अनेक वेळा टोयोटा लँड क्रूझरचा वापर होताना पाहिला असेल. एवढेच नाही, तर आपण शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेल्या टोयोटा लँड क्रूझरही अनेक वेळा पाहिल्या असतील. मात्र, अशी शस्त्रसज्ज टोयोटा लँड क्रूझर आपण क्वचितच पाहिली असेल, जिच्या संदर्भात आम्ही आपल्याला माहिती देत आहोत. ही शस्त्रास्त्रांनी सुसज्ज असलेली टोयोटा लँड क्रूझर केवळ हल्ल्यांपासून बचावच करत नाही, तर तिच्या सहाय्याने हल्लाही केला जाऊ शकतो. ही एसव्हीआय इंजिनिअरिंगने तयार केली आहे. (Toyota Land Cruiser Armoured)

ही Toyota Land Cruiser Armoured ऑफ-रोडिंगसाठी सक्षम आहे. या गाडीत ऑफ-रोड मोटरसायकल घेऊन जाण्यासाठी फ्लॅटबेडही देण्यात आला आहे. आपल्याला वाटत असेल, की हे तर कुठल्याही सामान्य गाडीचे फिचर्स आहेत, पण असे नाही. आपल्याला कुठल्याही सर्वसामान्य वाहनासोबत ड्रोन इंटरसेप्टिंग रडार उपकर आणि ग्रेनेड लाँचर मिळत नाही. मात्र, दक्षिण आफ्रिकेत अफ्रीका एअरोस्पेस अँड डिफेन्स शोमध्ये (AAD2022) सादर करण्यात आलेल्या, या गाडीत या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे.

ही एसयूव्ही प्रामुख्याने सैन्यदालासाठी तयार करण्यात आली आहे. ही एसयूव्ही J79 प्लेटफॉर्मवर आधारलेली आहे. हिला MAX 3 सिक्स-व्हीलर नाव देण्यात आले आहे. या एसयूव्हीला 6 टायर असतात. चांगल्या स्टॉपिंग पॉवरसाठी या सर्वच चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहे. या गाडीला पुढील बाजूस मोठी ग्रिल आणि चारही बाजूंना स्टील आर्मर आहे. तसेच, ग्रेनेड लाँचर ऑपरेट करण्यासाठी इंटिरियरमध्ये  कंट्रोल्स देण्यात आले आहे. या एसयूव्हीमध्ये 4 लोक बसू शकतात.

या एसयूव्हीमध्ये EN1063 BR6 प्रोटेक्शन लेव्हलची सुरक्षितता मिळते. तसेच आवश्यकता भासल्यास हिला BR7 मध्येही अपग्रेड केले जाऊ शकते. ही सुरक्षितता असॉल्ट रायफल्स आणि अँटी-पर्सोनल ग्रेनेड्सचाही सामना करण्यास पुरेशी आहे. या गाडीला 4.5L टर्बो डिझेल V8 इंजिन आहे. या लँड क्रूझरच्या मागच्या बाजूला एक रडारही देण्यात आले आहे. जे ड्रोनला इंटरसेप्ट करते आणि याचे बिल्ट-इन ऑटोमॅटिक ग्रेनेड लॉन्चर अॅक्टिव्हेट होते.

Web Title: Toyota Land Cruiser Armoured with drone interceptor and grenade launcher Know about the specialty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.