टोयोटाची आलिशान यारिस कार लॉन्च, जाणून घ्या किंमत
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2018 05:28 PM2018-04-25T17:28:22+5:302018-04-25T17:28:22+5:30
टोयोटा कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार बुधवारी लॉन्च केली. या आकर्षक कारचे 4 व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले आहेत.
नवी दिल्ली : टोयोटा कंपनीने त्यांची बहुप्रतिक्षीत मध्यम आकाराची सिडेन यारिस ही कार बुधवारी लॉन्च केली. या आकर्षक कारचे 4 व्हेरिएंट भारतात लॉन्च करण्यात आले आहेत. सध्या ग्राहक ही कार 50 हजार रुपये देऊन बुक करु शकता.
किती आहे कारची किंमत?
यारिस या कारची किंमत 8.5 लाख रुपयांपासून सुरु होते. ही केवळ पेट्रोल इंजिनची किंमत आहे. तर या कारच्या टॉप व्हेरिएंटची किंमत 14.07 लाख रुपये (एक्स शोरुम) ठेवण्यात आली आहे. ही कार आकर्षक 6 रंगांमध्ये मिळणार आहे.
दमदार इंजिन
टोयोटाने ही कार 4 व्हेरिएंटमध्ये लॉन्च केली आहे. यात मॅन्यूअल आणि सीवीटी ऑटोमॅटीक दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. या कारमध्ये 1.5 लीटरचं 4 सिलेंडर पेट्रोल इंजिन देण्यात आलं असून ते 107 बीएचपीची पॉवर आणि 140 न्यूटन-मीटरचा टॉर्क जनरेट करतं. यारिस कारमध्ये 6 स्पीड मॅन्यूअल आणि 7 स्पीड सीवीटी ऑटोमॅटीक ट्रान्समिशनचा पर्याय मिळणार आहे.
काय आहे खासियत?
या कारच्या टचस्क्रिन इन्फोटेन्मेंट सिस्टीममध्ये गेस्चर कंट्रोल, टायर प्रेशर मॉनिटरींग सिस्टम असे फिचर्स देण्यात आले आहेत. तसेच या कारमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने चारही चाकांना डिस्क ब्रेक देण्यात आले आहेत. यासोबतच कारमध्ये 7 एअरबॅग्स, हिल स्टार्ट असिस्ट, एबीएससारखे फिचर्स देण्यात आले आहेत.
वेगवेगळ्या व्हेरियंटची किंमत
मॅन्यूअल ट्रान्समिशन सीवीटी ऑटोमॅटिक
J Rs 8,75,000/- Rs 9,95,000/-
G Rs 10,56,000/- Rs 11,76,000/-
V Rs 11,70,000/- Rs 12,90,000/-
VX Rs 12,85,000/- Rs 14,07,000/-