Toyota ने लॉन्च केले Innova Crysta चे दोन नवीन व्हेरिएंट; पाहा, बेस मॉडेलपेक्षा किती पावरफुल?

By ऑनलाइन लोकमत | Published: May 2, 2023 04:18 PM2023-05-02T16:18:15+5:302023-05-02T16:18:41+5:30

या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 23.79 लाख (एक्स-शोरूम) आहे. आता इनोव्हा क्रिस्टा एकूण चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

toyota launches innova crysta vx and zx variants know price features and engine | Toyota ने लॉन्च केले Innova Crysta चे दोन नवीन व्हेरिएंट; पाहा, बेस मॉडेलपेक्षा किती पावरफुल?

Toyota ने लॉन्च केले Innova Crysta चे दोन नवीन व्हेरिएंट; पाहा, बेस मॉडेलपेक्षा किती पावरफुल?

googlenewsNext

नवी दिल्ली : इनोव्हा क्रिस्टा ही भारतातील सर्वात लोकप्रिय कार आहे. कंपनीने आपल्या ग्राहकांना अधिक फीचर्स असलेल्या सुविधा प्रदान करण्यासाठी व्हीएक्स आणि झेडएक्स व्हेरिएंट ही दोन हाय स्पेसिफिकेशन मॉडेल्स लॉन्च केली आहेत. या व्हेरिएंटची सुरुवातीची किंमत 23.79 लाख (एक्स-शोरूम) आहे. आता इनोव्हा क्रिस्टा एकूण चार व्हेरिएंटमध्ये उपलब्ध असणार आहे.

2023 टोयोटा इनोव्हा क्रिस्टाचे बुकिंग सुरु झाले आहे.  मॉडेलचे वितरण आता सुरू आहे. या एमपीव्हीच्या अपडेट व्हर्जनला G, GX, VX आणि ZX या चार व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आले आहे. सुपर व्हाइट, अॅटिट्यूड ब्लॅक माइका, ब्रॉन्झ मेटॅलिक, सिल्व्हर मेटॅलिक आणि प्लॅटिनम व्हाइट पर्ल या पाच  कलर ऑप्शनमध्ये ग्राहक आपली ड्रीम कार निवडू शकतात.

इनोव्हा क्रिस्टा इंजिन 
नवीन इनोव्हा क्रिस्टा 2.4-लिटर, चार-सिलिडर डिझेल इंजिन आहे, जे 148bhp आणि 343Nm टॉर्क जनरेट करते. इंजिन फक्त पाच-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. इको आणि पॉवर ड्राइव्ह मोड देखील ऑफरसाठी आहेत.

अॅडव्हान्स फीचर्स
टोयोटा इनोव्हा क्रिस्टा फेसलिफ्टला अपडटेड फेस मिळत आहे. चहुबाजूंनी क्रोम इन्सर्ट आणि टेल लाइट्समध्ये ब्लॅक इन्सर्ट आहेत. फीचर्सच्या बाबतीत बोलायचे झाल्यास, यात सुरक्षेसाठी सात एअरबॅग्ज, फ्रंट आणि रियर पार्किंग सेन्सर, ईबीडीसह एबीएस, ब्रेक असिस्ट, आठ-वे पॉवर-अॅडजस्टेबल ड्रायव्हर सीट, आठ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टम, Apple CarPlay आणि Android Auto कनेक्टिव्हिटी, एंबिएंट लाइट, दुसऱ्या रांगेतील सीट प्रवाशांसाठी टच टम्बल फंक्शन देण्यात आले आहे.

2023 इनोव्हा क्रिस्टाच्या व्हेरिएंटनुसार किमती
- इनोव्हा क्रिस्टा व्हीएक्स फ्लाइट 7 एस : 23.79 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- इनोव्हा क्रिस्टा व्हीएक्स फ्लाइट 8 एस : 23.84 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- इनोव्हा क्रिस्टा व्हीएक्स 7 एस : 23.79 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- इनोव्हा क्रिस्टा व्हीएक्स 8 एस : 23.84 लाख रुपये (एक्स-शोरूम)
- इनोव्हा क्रिस्टा झेडएक्स 7 एस : 25.43 लाख रुपये (एक्स-शोरूम)
 

Web Title: toyota launches innova crysta vx and zx variants know price features and engine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.