टोयोटा बनवणार अप्रतिम बॅटरी, 10 मिनिटात चार्ज होणार इलेक्ट्रिक कार, रेंज असेल 1000 किमी!
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2023 04:23 PM2023-06-14T16:23:03+5:302023-06-14T16:23:53+5:30
टोयोटा ही जगातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. पण, इलेक्ट्रिक कारच्या जगात टेस्लाची मक्तेदारी आहे.
आता तुम्ही इलेक्ट्रिक कार चालवताना एकाच वेळी 1000 किमी प्रवास करू शकाल. एवढेच नाही तर इलेक्ट्रिक कार अवघ्या 10 मिनिटांत चार्ज होतील. दिग्गज ऑटोमोबाईल कंपनी टोयोटाने सॉलिड-स्टेट बॅटरी अधिक प्रगत करण्याची घोषणा केली आहे. याशिवाय, कंपनी नवीन इलेक्ट्रिक गाड्यांची रेंज आणि परफॉर्मेंस सुधारण्यावर काम करणार आहे. या सर्व गोष्टी करताना खर्चाचीही काळजी घेतली जाईल, जेणेकरून लोकांना परवडणाऱ्या दरात ईव्ही सुविधांचा लाभ मिळेल.
टोयोटा ही जगातील सर्वात मोठी कार कंपनी आहे. पण, इलेक्ट्रिक कारच्या जगात टेस्लाची मक्तेदारी आहे. तसेच टोयोटाला जपानी इलेक्ट्रिक कार मार्केटमधली नंबर वन कंपनी बनवायची आहे. त्यामुळे कंपनीने आपली योजना जाहीर केली आहे. या अंतर्गत ऑटो कंपनी नेक्स्ट जनरेशन बॅटरीचा विकास आणि उत्पादन सुविधा सुधारेल.
जपानी कार कंपनी सध्या नेक्स्ट-जनरेशनच्या लिथियम-आयन बॅटरीच्या विकासावर काम करत आहे. हे 2026 मध्ये सादर केले जाऊ शकतात. नेक्स्ट जनरेशनच्या बॅटरी अधिक रेंज आणि उत्तम फास्ट चार्जिंग क्षमतेसह येतील. विशेषतः टोयोटा एक इलेक्ट्रिक कार विकसित करण्यावर काम करत आहे, जी फुल चार्ज झाल्यानंतर 1,000 किमी प्रवास करू शकते.
कंपनीला अशी इलेक्ट्रिक कार बनवायची आहे, जी केवळ 10 मिनिटांत पूर्ण चार्ज होईल. टोयोटा नवीन योजनेद्वारे टेस्लाला आव्हान देईल. सध्या, टेस्ला मॉडेल Y ची रेंज सिंगल चार्जवर 530 किमी आहे. टोयोटाच्या नवीन इलेक्ट्रिक कार मॉडेल Y रेंजला मागे टाकतील. इलेक्ट्रिक कारच्या चांगल्या बॅटरी क्षमतेमुळे हे करता येते.
इलेक्ट्रिक कार खरेदी करताना चार्जिंगची समस्या येते. त्यांना चार्ज करण्यासाठी अनेक तास लागतात आणि ते वर्षानुवर्षेही टिकत नाहीत. या समस्येतून सुटका करून घेण्यासाठी टोयोटा महत्त्वाची भूमिका बजावू शकते. कंपनी अशा सॉलिड-स्टेट बॅटरी विकसित करण्याचा विचार करत आहे, जी टिकाऊपणाच्या बाबतीत खूप पुढे असेल आणि ग्राहकांना दीर्घकाळ साथ देईल.