शेतकऱ्यांसाठी Toyota ची शानदार ऑफर; मका, सोयाबिनच्या बदल्यात मिळेल SUV कार!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2021 02:37 PM2021-08-08T14:37:16+5:302021-08-08T14:38:59+5:30
toyota motors : टोयोटा बार्टर (Toyota Barter) नावाच्या या योजनेमध्ये शेतकरी सोयाबीन किंवा मका या धान्याच्या बदल्यात टोयोटा एसयूव्ही किंवा टोयोटा पिकअप घेऊ शकतील.
जपानी कंपनीने (Japanese Company) ऑटोमोबाईल क्षेत्रात (Automobile Sector) एक खास निर्णय घेत अनोखा ट्रेंड (Unique Payment Trend) आणला आहे. ही कंपनी दक्षिण अमेरिकेतील (South America) शेतकऱ्यांना लक्झरी कार खरेदी करण्याची संधी देत आहे. विशेष म्हणजे, या शेतकऱ्यांना कार खरेदी करण्यासाठी त्यांचे धान्य विकून पैसे द्यावे लागणार नाहीत, तर ते आपले धान्य थेट शोरूममध्ये आणू शकतील आणि त्या बदल्यात आलिशान कार घरी घेऊन जाऊ शकतील.
टोयोटा बार्टर (Toyota Barter) नावाच्या या योजनेमध्ये शेतकरी सोयाबीन किंवा मका या धान्याच्या बदल्यात टोयोटा एसयूव्ही किंवा टोयोटा पिकअप घेऊ शकतील. कंपनीनने याला अॅग्री बिझनेसचे नाव देत शेतकऱ्यांना सर्वोत्तम ऑफर दिली आहे. सोयाबीन आणि मका या धान्याच्या बदल्यात शेतकऱ्यांना टोयोटा हिलक्स पिकअप ट्रक, टोयोटा फॉर्च्युनर किंवा टोयोटा कोरोला क्रॉस एसयूव्ही ही वाहने मिळून शकतील.
तुमच्याजवळ #Airtel चे सिम असेल तर मिळेल 4 लाखांचा फायदा, जाणून घ्या कसा? https://t.co/DEgQiikq9o
— Lokmat (@MiLOKMAT) August 8, 2021
धान्याच्या बदल्यात मिळणार कार
या ऑफरसाठी शेतकऱ्यांकडून सोयाबीन आणि मका हे धान्य बाजार भावाने घेतले जाईल. या धान्याचे वजन बाजारभावाप्रमाणे कारच्या दरापर्यंत होईल, त्यावेळी ती कार शेतकऱ्याची असेल. तसेच, या धान्याची आधी चांगली तपासणी केली जाईल. गुणवत्ता तपासणीनंतरच ते घेतले जाईल. दरम्यान, आपल्या माहितीसाठी ब्राझीलमध्ये टोयोटाची 16 टक्के थेट विक्री कृषी क्षेत्रातून येते. अशा परिस्थितीत कार निर्मात्यांना आशा आहे की, ही ऑफर त्यांची विक्री वाढवणार आहे.
रोख किंवा कार्ड पेमेंटची झंझट नाही
2019 साली हा पायलट प्रोजेक्ट कंपनीने सुरू केला आहे. परंतु आता हा अॅग्री बिझनेस वाढवला जात आहे, जेणेकरून कंपनीला विक्रीमध्ये लाभ मिळू शकेल. ही योजना ब्राझीलमधील बाहिया, मॅटो ग्रासो, गोईयास, साओ पाउलो सारख्या भागात चालू आहे. आता ते इतर ठिकाणीही राबविली जात आहे. तसेच, या पेमेंट सिस्टीमद्वारे, रोख किंवा कार्डद्वारे पेमेंट करण्याची समस्या येत नाही आणि शेतकरी थेट धान्य देऊन गाडी त्यांच्या घरी घेऊन जाऊ शकतात. दरम्यान, पूर्वीच्या काळात धान्याच्या बदल्यात साहित्य घेण्याची व्यवस्था भारतातही चालू होती. मात्र, सध्या कंपनी ही योजना भारतीय बाजारात आणणार नाही, परंतु काही वाहने नक्कीच आणणार असल्याचे समजते.