Maruti च्या जाळ्यात अडकली Toyota? एका 'चुकी'नं सगळा खेळ बिघडवला!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 21, 2022 04:49 PM2022-12-21T16:49:24+5:302022-12-21T16:50:30+5:30

या दोन्ही कार साधारणपणे सारख्याच आहेत. कारण यात मेकॅनिकल्स, प्लॅटफॉर्म आणि फीचर्स साधारणपणे सारखेच आहेत.

Toyota stuck in Maruti's trap grand vitara sales higher than toyota urban cruiser hyryder | Maruti च्या जाळ्यात अडकली Toyota? एका 'चुकी'नं सगळा खेळ बिघडवला!

Maruti च्या जाळ्यात अडकली Toyota? एका 'चुकी'नं सगळा खेळ बिघडवला!

googlenewsNext

मारुती सुझुकी ग्रँड विटारा, ही गेल्या काही दिवसांपासून जबरदस्त चर्चेत आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे, ग्रँड विटारा ही मारुतीची सर्वात महागडी कार आहे आणि या कारसाठी मजबूत हायब्रिड तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. यामुळे ही SUV जवळपा 28 किमीपर्यंत मायलेज देते. अशीच आणखी एक एसयूव्ही आहे, ही एयूव्ही देखील स्ट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजीसह 28 किलोमीटरपर्यंतचे मायलेज ऑफर करते. या कारचे नाव आहे, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडर. या दोन्ही कार साधारणपणे सारख्याच आहेत. कारण यात मेकॅनिकल्स, प्लॅटफॉर्म आणि फीचर्स साधारणपणे सारखेच आहेत.

स्ट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजीदेखील टोयोटाची आहे. हीच टेक्नॉलॉजी ग्रँड विटारामध्येही देण्यात आली आहे. या दोन्ही कार टोयोटा आपल्याच प्लांटमध्ये तयार करत आहे. मात्र, मारुती सुझुकी ग्रँड विटाराची विक्री अधिक होत आहे. म्हणजेच, जी स्ट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजी हिच्या विक्रीतील एक मोठा फॅक्टर आहे, ती टोयोटाचीच आहे. मात्र, विक्रीच्या बाबतीत तिचा सर्वाधिक फायदा मारुतीलाच होताना दिसत आहे. मारुती सुझुकीने नोव्हेंबर 2022 मध्ये ग्रँड विटारा एसयूव्हीच्या 4,433 युनिट्सची विक्री केली आहे. तर टोयोटा आपल्या अर्बन क्रूझर हायरायडरच्या केवळ 3,116 युनिटचीच विक्री करू शकली आहे.

इंजिन आणि किंमत - 
ग्रँड विटारा आणि हायरायडर, या दोन्ही दोन-दोन पॉवरट्रेन ऑप्शनसह उपलब्ध आहेत. या दोन्ही कारला 1.5-लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. म्हहत्वाचे म्हणजे हे इंजिन सट्रॉन्ग हायब्रिड टेक्नॉलॉजीलो जोडण्यात आले आहे. स्ट्रॉन्ग हायब्रिड व्हेरिअंट्समध्ये ई-सीव्हीटी मिळते. तसेच, माइल्ड हायब्रिड सेटअपमध्ये 1.5-लीटर पेट्रोल इंजिन मिळते. हे 5-स्पीड MT आणि 6-स्पीड AT सह ऑफर करण्यात आले आहे. ग्रँड विटारा आणि हायरायडरमध्ये मॅन्युअल व्हेरिअंटमध्ये AWD (ऑप्शनल) देखील ऑफर करण्यात आले आहे.

मारुती सुझुकी ग्रँड विटाराची किंमत 10.45 लाख रुपये ते 19.49 लाख रुपयांपर्यंत जाते. तसेच, टोयोटा अर्बन क्रुझर हायरायडरची किंमत 10.48 लाख रुपये ते 18.99 लाख रुपयांपर्यंत जाते (एक्स-शोरूम).

Web Title: Toyota stuck in Maruti's trap grand vitara sales higher than toyota urban cruiser hyryder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.