Toyota Upcoming Car: टोयोटाची नवी एसयुव्ही येणार; क्रेटा, सेल्टॉस, नेक्सॉनचा खेळ खल्लास करणार
By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2023 10:35 AM2023-01-01T10:35:42+5:302023-01-01T10:36:03+5:30
टोयोटा यारिस क्रॉसची विक्री जागतिक बाजारात होत आहे. ही एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लवकरच दाखल होण्याची दाट शक्यता आहे.
येत्या काळात जगातील सर्वात मोठी कंपनी टोयोटा आणि भारतातील सर्वात मोठी कंपनी मारुती सुझुकी पार्टनरशिपमध्ये एक नवीन एसयुव्ही आणण्याची शक्यता आहे. या एसयुव्हीचे नाव टोयोटा यारिस क्रॉस ठेवले जाऊ शकते. या कारला टेस्टिंगवेळी देखील स्पॉट केले गेले आहे.
टोयोटा यारिस क्रॉस ही एसयुव्ही ह्युंदाई क्रेटा आणि किया सेल्टॉसला टक्कर देऊ शकते. मारुती सुझुकी आणि टोयोटा यांनी यापूर्वीच टोयोटा ग्लान्झा (हॅचबॅक) आणि अर्बन क्रूझर (एसयूव्ही) सारख्या कार एकत्रितपणे आणल्या आहेत. आता दोन्ही कंपन्या मिळून त्यांच्या पुढील SUV कार आणणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, यामध्ये अनेक अॅडव्हान्स फीचर्स पाहायला मिळतील.
टोयोटा यारिस क्रॉसची विक्री जागतिक बाजारात होत आहे. ही एसयूव्ही कार भारतीय ऑटो मार्केटमध्ये लवकरच दाखल होण्याची दाट शक्यता आहे. ही एसयुव्ही 4.18 मीटर लांब, व्हील बेस 2.56 मीटर आहे. या एसयुव्हीला हायब्रिड तंत्रज्ञानासह 1.5 L पेट्रोल इंजिन दिले जाऊ शकते. याशिवाय सुझुकी आणि टोयोटा यांच्या भागीदारीत आगामी काळात आणखी गाड्या येण्याची शक्यता आहे.
क्रेटा ही भारतीय ऑटो मार्केटमध्ये सर्वाधिक मागणी असलेली कार आहे. कंपनी या कारमध्ये 1353cc ते 1497cc पर्यंतचे इंजिन देते. त्याची सुरुवातीची किंमत 10.44 लाख रुपये आहे. यामुळे याचा प्राईज रेंजमध्ये टोय़ोटाची कार असणार आहे. किया सेल्टॉसदेखील क्रेटासारखीच आहे.