आता Creta चे काय होणार! Toyota ने 13 लाख किमतीची Hyryder CNG केली लाँच, 26KM पेक्षा जास्त मायलेज

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 03:00 PM2023-01-30T15:00:14+5:302023-01-30T15:01:02+5:30

Toyota Urban Cruiser Hyryder CNG : कंपनीने सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे.

toyota urban cruiser hyryder cng variant launched price and features | आता Creta चे काय होणार! Toyota ने 13 लाख किमतीची Hyryder CNG केली लाँच, 26KM पेक्षा जास्त मायलेज

आता Creta चे काय होणार! Toyota ने 13 लाख किमतीची Hyryder CNG केली लाँच, 26KM पेक्षा जास्त मायलेज

googlenewsNext

नवी दिल्ली : टोयोटाने मिड-साईज एसयूव्ही सेगमेंटमधील पहिली सीएनजी कार लाँच केली आहे. कंपनीने Toyota Urban Cruiser Hyryder CNG ची किंमत जाहीर केली आहे. कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये सीएनजी (CNG) कॅटगरीत एन्ट्री केली होती. आता सीएनजी व्हेरिएंट असलेली टोयोटा हायरायडर (Toyota Hyryder) दोन व्हेरिएंटमध्ये आणली आहे.

यामध्ये एक  Hyrider G आणि  Hyrider S आहे . विशेष म्हणजे या कारची सुरुवातीची किंमत जवळपास 13 लाख रुपये आहे. या स्पर्धात्मक किमतीमुळे Hyundai Creta आणि Kia Seltos सारख्या कारच्या विक्रीवर परिणाम होऊ शकतो. टोयोटा नंतर मारुतीही आपला ग्रँड विटारा सीएनजी अवतारात आणू शकते.

कोणत्या व्हेरिएंटची किंमत किती?
कंपनीची टोयोटा अर्बन क्रूझर हायराइडर सीएनजीला (Toyota Urban Cruiser Hyryder CNG) दोन व्हेरिएंट आणि फक्त मॅन्युअल ट्रान्समिशनसह लाँच करण्यात आली आहे. कारच्या S व्हेरिएंटची किंमत 13,23,000 रुपये आणि G व्हेरिएंटची किंमत 15,29,000 रुपये ठेवण्यात आली आहे.

सीएनजीमध्ये किती मायलेज?
टोयोटाने ही एसयूव्ही (SUV) जुलै 2022 मध्ये बाजारात आणली होती. ही साधारण पेट्रोल इंजिन आणि हायब्रीडसह जोडलेले पेट्रोल इंजिनसह आणले होते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, त्यांना या एसयव्हीसाठी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाला आहे. सीएनजी व्हर्जन असलेली अर्बन क्रुझर हायरायडरमध्ये 1.5-लीटरचे सिरीज इंजिन देण्यात आले आहे. हे इंजिन 5 स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशनशी जोडलेले आहे. सीएनजीसोबत ही एसयूव्ही 26.6 KM/KG मायलेज देणार आहे.

काय आहेत फीचर्स?
र्बन क्रुझर हायरायडरच्या G व्हेरिएंटमध्ये फुल-एलईडी हेडलॅम्प, 9-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट, अॅम्बियंट लाइटिंग आणि साइड अँड कर्टन एअरबॅग्ज यांसारखी फीचर्स आहेत. हायरायडर सीएनजीनंतर मारुती कंपनी सुद्धा आपल्या ग्रँड विटाराचे सीएनजी व्हर्जन बाजारात आणू शकते. ही दोन्ही कारचा एकमेकांशी सामना होऊ शकतो. 

Web Title: toyota urban cruiser hyryder cng variant launched price and features

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.