Toyota Taisor: टोयोटानं लॉन्च केली स्वस्त आणि मस्त SUV; किंमत, मायलेज अन् दमदार फिचर्स जाणून घ्या...!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2024 03:19 PM2024-04-03T15:19:00+5:302024-04-03T15:43:02+5:30
Toyota Taisor अर्बन क्रूझर सीरिजमधील ही एसयूव्ही कार Maruti Fronx चं बॅज इंजिनिअर्ड व्हर्जन आहे. सुझूकी-टोयोटामध्ये झालेल्या कराराच्या अंतर्गत तयार केली गेलेली ही नवी एसयूव्ही आहे.
Toyota Urban Cruiser Taisor launched: टोयोटा किर्सोस्कर मोटरनं आज भारतीय बाजारात आपली सर्वात स्वस्त एसयूव्ही Toyota Taisor लॉन्च केली. अर्बन क्रूझर सीरिजमधील एसयूव्ही सेगमेंटपैकी Maruti Fronx चं हे एक रिब्रँडेड व्हर्जन आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत ७.७४ लाख रुपयांपासून सुरू होते. तर टॉप व्हेरिअंटची किंमत १३.०४ लाख रुपयांपर्यंत आहे.
Taisor मध्ये नवीन काय?
Urban Cruiser Taisor चे बॉडी पॅनल जवळपास मारुती फ्रॉन्क्स सारखेच आहेत. हनीकॉम्ब पॅटर्नच्या नव्या डिझाइनचं फ्रंट पॅनल आणि नव्या डिझाइनचं फ्रंट बंपर पाहायला मिळेल. LED डीआरएलमध्ये फ्रॉन्क्सच्या LED डीआरएलमध्ये देण्यात आलेल्या ३ क्यूब्स ऐवजी या कारमध्ये नवं डिझाइन देण्यात आलं आहे. तसंच टेल लाइट्समध्येही बदल करण्यात आला आहे. याशिवाय Taisor मध्ये नव्या डिझाइनचे १६ इंचाचे डायमंड कट अलॉय व्हील्स दिले गेले आहेत.
केबिन कसं आहे?
Taisor च्या इंटेरिअरमध्ये थोडे बदल केले गेले आहेत. ड्युअल टोन ब्राउन आणि ब्लॅक रंगसंगती दिली गेली आहे. तसंच ९ इंचाचा टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट स्क्रीन दिला गेला आहे. जो वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्लेसोबत उपलब्ध आहे. इतर फिचर्समध्ये ऑटो क्लायमेट कंट्रोल, ३६०-डीग्री कॅमेरा, हेड अप डिस्प्ले, वायरलेस चार्जर, स्मार्टवॉच कनेक्टिव्हिटी इत्यादी देण्यात आलं आहे.
पावर आणि परफॉरमन्स
Toyota Taisor मध्ये कंपनीनं फ्रॉन्क्स कार सारखंच १.२ लीटर, चार-सिलिंडर नॅचरली अॅस्परेटेड पेट्रोल आणि १.० लीटर, तीन सिलिंडर टर्बो पेट्रोल इंजिनचा पर्याय दिला आहे. नॅचरली अॅस्परेटेड इंजिन जे 90hp पावर आणि 113Nm चं टॉर्क जनरेट करतं. यात ५-स्पीड मॅन्युअल ट्रान्समिशन आणि ऑप्शनल AMT सह कार उपलब्ध केली गेली आहे. तर टर्बो पेट्रोल इंजिन ५-स्पीड मॅन्युअलसोबतच ऑप्शनल ६-स्पीड टॉर्क कन्व्हर्टर ऑटोमॅटीकही उपलब्ध केली गेली आहे. इतकंच नव्हे तर टोयोटानं ही एसयूव्ही CNG पर्यायातही लॉन्च केली आहे.
सेफ्टी फिचर्स आणि रंगसंगती
सुरक्षेच्या बाबतीत कारमध्ये ६ एअरबॅग्स, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी प्रोगाम (ESP), हिल-होल्ड असिस्ट, इलेक्ट्रॉनिक ब्रेकफोर्स डिस्ट्रिब्यूशन (EBD) सह अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम (ABS) आणि आयएसओफिक्स चाइल्ड सीट अँकरेज देखील दिलं गेलं आहे. ही एसयूव्ही कॅफे व्हाइट, एन्टिसिंग सिल्वर, स्पोर्टिंग रेड, ल्यूसेंट ऑरेंज आणि गेमिंग ग्रे या रंगांमध्ये उपलब्ध आहे.
जबरदस्त मायलेज
कंपनीनं केलेल्या दाव्यानुसार Toyota Taisor चं टर्बो पेट्रोल मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिअंट २१.५ किमी प्रतिलीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंट २०.० किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देईल. तर १.२ लीटर पेट्रोल इंजिन मॅन्युअल ट्रान्समिशन व्हेरिअंट २१.७ किमी प्रतिलीटर आणि ऑटोमॅटिक व्हेरिअंट २२.८ किमी प्रतिलीटर इतकं मायलेज देईल. तर याचं सीएनजी व्हेरिअंट सर्वाधिक २८.५ किमी प्रतिकिलो इतकं मायलेज देईल.