Traffic Rule: चुकूनही ही चूक करू नका! 15 हजारांचा फाईन किंवा दोन वर्षांची जेलची हवा वेगळी...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 01:32 PM2023-03-08T13:32:34+5:302023-03-08T13:32:59+5:30
सध्या तरुणाई मौजमजा करताना या नियमांचे पालन करत नाहीत. यामध्ये एक चूक अशी आहे जी तुम्हाला १०-१५ हजारांचा फाईन तर लावेलच परंतू तुरुंगाची वारी देखील घडवू शकते.
वाहतुकीचे नियम एवढे आहेत की सगळेच मोडत बसलात तर एक दिवस गाडी विकून त्यांचा फाईन भरावा लागेल. काही नियम हे तुमच्या सुरक्षेसाठी आहेत, काही इतरांच्या. परंतू ते पाळले नाहीत तर अपघात हे होतात. वाहतूक पोलीस आता बहुतांश पावत्या या सीसीटीव्ही कॅमेरे पाहून घरीच पाठवतात. परंतू, अनेकदा ते वाहतुकीचे नियमन करता करता गाड्या अडवून तपासणीही करतात.
सध्या तरुणाई मौजमजा करताना या नियमांचे पालन करत नाहीत. यामध्ये एक चूक अशी आहे जी तुम्हाला १०-१५ हजारांचा फाईन तर लावेलच परंतू तुरुंगाची वारी देखील घडवू शकते. ड्रंक अँड ड्राईव्हचा गुन्हा तुम्हाला सळ्यांच्या मागे टाकू शकतो. यामध्ये सहा महिन्यांच्या शिक्षेची तरतूद आहे.
दारु पिऊन गाडी चालविणाऱ्यांमुळे बहुतांश अपघात होतात, असे एका सर्वेक्षणात म्हटले आहे. दारु पिऊन किंवा अन्य कोणत्याही अंमलाखाली वाहन चालविल्यास मोटार वाहन कायदा 2019 च्या कलम 185 नुसार दारु पिऊन गाडी चालविणे हा गुन्हा आहे. ड्रंक ड्राईव्ह करताना पकडले गेल्यास १० हजार ते १५ हजार रुपयांचा दंड आहे. २०१९ पूर्वी तो २००० रुपये होता.
पहिल्या वेळी पकडले गेल्यास १०००० रुपयांचा दंड किंवा ६ महिन्यांची कैद होऊ शकते. दुसऱ्यांदा पकडले गेल्यास १५००० रुपयांचा दंड आणि दोन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो. तर त्यानंतर पुन्हा पकडला गेल्यास लायसन्सच रद्द होऊ शकते. मद्यपान करून वाहन चालविताना सापडल्यास पावती फाडून तुमची कार-स्कूटर ताब्यात घेतली जाईल. हा दंड भरल्यानंतरच तुमचे वाहन तुम्हाला परत केले जाईल. यासाठी वाहतूक पोलीस ठाण्यात जाऊन दंड भरावा किंवा ऑनलाईन दंड भरता येणार आहे.