वाहतुकीचे नियम! कार असो की बाईक, पोलीस फाडतील ४०००० चे चलन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2023 01:57 PM2023-04-11T13:57:38+5:302023-04-11T14:01:42+5:30

अनेक लोक असे आहेत, ज्यांना वाहतुकीचे नियम कधीच पाळायचे नसतात. त्यांच्यासाठीही ही माहिती महत्वाची आहे.

Traffic rules! Be it a car or a bike, the police will tear the challan of 40000 rs be aware | वाहतुकीचे नियम! कार असो की बाईक, पोलीस फाडतील ४०००० चे चलन

वाहतुकीचे नियम! कार असो की बाईक, पोलीस फाडतील ४०००० चे चलन

googlenewsNext

आजकाल वाहन चालविणे सोपे राहिलेले नाही. नाक्या नाक्यावर पोलिसांची नजर असते. स्पीड कॅमेरे असतात, डाव्या बाजुला सायकल ट्रॅक असतो. त्यात सिग्नलवर तर हमखास थोडी पुढे गाडी उभी राहिली की चलन कापले म्हणून समजा. आता तर एक असा नियम आहे, तो मोडला तर कार असो की बाईक ४०००० चे चलन घरी आलेच म्हणून समजा. 

अनेक लोक असे आहेत, ज्यांना वाहतुकीचे नियम कधीच पाळायचे नसतात. त्यांच्यासाठीही ही माहिती महत्वाची आहे. कारण आता ट्रॅफिक पोलीस गाडीचा नंबर तपासून आधीची पेंडिंग असलेली चलन तपासत आहेत. मग गाडीच जप्त करत आहेत. जर तुम्ही एकाचवेळी वेगवेगळे नियम मोडलेत तर मग बघायलाच नको. 

जर तुम्ही गाडीची पीयुसी काढली नसेल आणि त्याचेळी तुमचे ड्रायव्हिंग लायसन निलंबित झाले असेल याचबरोबर तुम्ही गाडीचा इन्शुरन्स नसताना ड्रंक अँड डाईव्ह करत असताना सापडलात तर वाहतूक पोलीस भले मोठे चलन फाडतात. या परिस्थितीत जर तुम्हाला वाहतूक पोलिसांनी थांबविले तर नियमांचे दंड एकदा पहाच...

जर दुसऱ्यांदा मद्यपान करून गाडी चालविताना पकडले तर १५००० रुपये दंड, ड्रायव्हिंग लायसन रद्द केलेले असेल तर १०००० रुपये, पीयुसीसाठी १० हजार रुपये आणि इन्शुरन्स नसल्याने त्याचे ४००० रुपये असा दंड आकारला जाईल. यामुळे वाहतुकीचे नियम पाळले तर एवढ्या मोठ्या दंडापासून तुमची सुटका होईल. काहींच्या तर दुचाकीची किंमतच तेवढी असू शकते. 

Web Title: Traffic rules! Be it a car or a bike, the police will tear the challan of 40000 rs be aware

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.