Traffic Rules: ट्रॅफिक पोलिसाला गाडीची चावी काढण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या ट्रॅफिक संदर्भातील नियम...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 03:02 PM2022-12-14T15:02:25+5:302022-12-14T15:02:34+5:30
Traffic Rules: रस्त्याने गाडी चालवत असताना अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात, पण त्यांना असं करण्याचा अधिकार असतो का..?
Traffic Rules: रस्त्याने गाडी चालवत असताना अनेक वेळा ट्रॅफिक पोलीस अडवतात. अनेकदा पोलीस आपल्या गाडीची चावी काढून घेतात, पण त्यांना असं करण्याचा अधिकार असतो का..? भारतात पोलिसांच्या गैरवर्तनाची अनेक उदारहणे आपण ऐकतो अथवा पाहतो. अशा परिस्थितीत एक चालक म्हणून आपल्याला आपले अधिकार माहीत असायलाच हवेत. आज आम्ही तुम्हाला वाहनांची चावी काढण्यापासून ते इतरही काही आवश्यक नियमांसंदर्भात माहिती देणार आहोत.
हे डॉक्यूमेन्ट्स नक्की सोबत ठेवा
आपण नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर आपल्याला घाबरण्याचे काहीही कारण नाही. मात्र, काही आवश्यक कागदपत्रे आपण नेहमीच वाहन चालवताना सोबत ठेवायला हवीत. जसे, Registration certificate (आरसी), Pollution under control (पीयूसी), Insurance document आणि Driving licence.
हे नियम आपल्याला माहित असायला हवेत
- वाहतूक पोलिस अधिकाऱ्याने नेहमीच गणवेशात असायला हवे. युनिफॉर्मवर बक्कल नंबर आणि त्यांचे नाव असावे. ते गणवेशात नसतील तर तुम्ही पोलीस कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र विचारू शकता. जर त्यांनी ते दाखविण्यास नकार दिला, तर आपणही आपले डॉक्यूमेंट्स दाखविण्यास नकार देऊ शकता.
- आपल्याकडे त्या क्षणी दंडाचे पैसे भरण्यासाठी पैसे नसतील, तर आपण ते नंतरही भरू शकता. अशा स्थितीत न्यायालय चालान जारी करते, तेही न्यायालयात जाऊन भरावे लागेल. या काळात वाहतूक अधिकारी आपले ड्रायव्हिंग लायसन्स त्यांच्याकडे ठेवू शकतात.
- आपले चालान कापण्यासाठी वाहतूक पोलिसांकडे चालान बुक अथवा ई-चलान मशीन असणे आवश्यक आहे. जर यांपैकी काहीच नसेल तर आपले चालान कापले जाऊ शकत नाही.
- जर ट्रॅफिक पोलिसाने आपले कुठलेही कागदपत्र जप्त करण्याचा निर्णय घेतला असेल अथवा जप्त करत असेल, तर त्याची पावतीही मागून घ्या. एक
- पोलीस अधिकारी आपल्या परवानगीशिवाय आपल्या कारची चावी घेऊन जाऊ शकत नाही. जर ट्रॅफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढून घेत असेल, तर तुम्ही त्या घटनेचा व्हिडीओ बनवू शकता. हा व्हिडीओ तुम्ही त्या भागातील पोलीस ठाण्यात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यास दाखवून तक्रारही करू शकता.