संपूर्ण भारतात कुठेही बाईक 'ट्रान्सपोर्ट' करा; गतीने आणली खास बाईक एक्स्प्रेस सेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2023 02:16 PM2023-06-29T14:16:13+5:302023-06-29T14:16:45+5:30

व्यावसायिक, नवीन ठिकाणी स्थलांतरित होणारे विद्यार्थी, स्वतंत्रपणे प्रवास करण्यासाठी पर्यटक आणि दुचाकीस्वारांसाठी ही सेवा खासरित्या डिझाइन केली गेली आहे.

Transport bikes anywhere across India; Bike Express service started by Gati | संपूर्ण भारतात कुठेही बाईक 'ट्रान्सपोर्ट' करा; गतीने आणली खास बाईक एक्स्प्रेस सेवा

संपूर्ण भारतात कुठेही बाईक 'ट्रान्सपोर्ट' करा; गतीने आणली खास बाईक एक्स्प्रेस सेवा

googlenewsNext

गोवा : ऑलकार्गो ग्रुप कंपनीची एक भाग असणारी व भारतातील प्रमुख एक्स्प्रेस लॉजिस्टिक आणि सप्लाय चेन सोल्यूशन्स प्रदात्यांपैकी एक गती लिमिटेडने बाईक एक्सप्रेस ही सेवा सादर केली आहे.
व्यावसायिक, नवीन ठिकाणी स्थलांतरित होणारे विद्यार्थी, पर्यटक, दुचाकीस्वार यांच्यासाठी ही सेवा असणार आहे. यामुळे ग्राहक त्यांचे वाहन एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकणार आहेत. ही सेवा देशाच्या कानाकोपऱ्यात उपलब्ध केली जाणार आहे. 

पॅन-इंडिया मोफत आणि सुलभ डोअर पिक-अप आणि डिलिव्हरी, ऑन-स्पॉट पॅकिंग, कस्टमाइज्ड डिलिव्हरी, विशेष प्रवास मोहीम नियोजन, विशेष प्रशिक्षित आणि अनुभवी व्यावसायिकांद्वारे सेवा, शिवाय वेदर प्रूफ कंटेनर वाहनाद्वारे वाहतूक, ट्रॅकिंग, २४/७ ग्राहक सेवा आदींचा समावेश आहे. बाइक एक्सप्रेस सेवा वाजवी दरात उपलब्ध करण्यात आली आहे. 

१५० सीसीच्या वाहनांसाठी ४००० रुपयांपर्यंत आणि १५० सीसी वरील ४५०० रुपये शुल्क आकारणात येणार आहे. ही सेवा देशातील ७३९ जिल्ह्यांपैकी ७३५ जिल्ह्यांत आणि १९८०० पिन कोडमध्ये उपलब्ध केली जात आहे. 

मागील काळात बाईक एक्सप्रेसने मिळवलेले यश हे लक्षात ठेवून गति लि.चे मुख्य वाणिज्य अधिकारी हुफ्रीद नसरवानजी म्हणाले की, बाईकसह नवीन ठिकाणी जाण्यामुळे ताण वाढतो. अत्यंत अनुभवी आणि प्रशिक्षित लोकांसह आमची खास डिझाइन केलेली बाइक एक्सप्रेस संपूर्ण भारतभर कार्यक्षम आणि सुरक्षित बाईक वाहतूक सेवा देते. उत्साही बाईकर्स किंवा पर्यटकांसाठी, बाईक एक्स्प्रेस मोहिमेदरम्यान आणि सुट्टीच्या हंगामात वाहतूक सेवा प्रदाता म्हणून उदयास आली आहे. बाईक एक्सप्रेससह, आम्ही सानुकूलित, टॉप-रेट केलेली आणि कार्यक्षम बाईक वाहतूक सेवा ऑफर करतो. सध्या सुरू असलेल्या सुट्टीच्या मोसमात, आम्ही आमच्या बाईक एक्सप्रेस सेवेसाठी जोरदार मागणी पाहत आहोत. देशातील ९९% पिन कोड आणि अतुलनीय ग्राहक केंद्रीत आमची अतुलनीय पोहोच असलेल्या विविध बाईक वाहतुकीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची सानुकूल आणि नाविन्यपूर्ण बाइक एक्सप्रेस सेवा देत राहू.  बाईक एक्सप्रेस कॅम्पसमध्ये स्थानांतरित करण्यासाठी स्टुडंट एक्सप्रेस, कलाकृती हलवण्यासाठी आर्ट एक्सप्रेस आणि आंब्याची वाहतूक करण्यासाठी मँगो एक्सप्रेसचा समावेश आहे.

अधिक माहिती मिळविण्यासाठी आणि बाईक सेवांचा लाभ घेण्यासाठी इथे क्लिक करा...

Web Title: Transport bikes anywhere across India; Bike Express service started by Gati

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन