केवळ एका चार्जिंगमध्ये १ हजार किमी प्रवास; सुपर सोलर कारची गिनीज बुकमध्ये नोंद
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2022 11:19 AM2022-12-25T11:19:21+5:302022-12-25T11:20:26+5:30
ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स सिडनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सुपर साेलर कार बनविली आहे.
सिडनी: ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स सिडनी विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांनी सुपर साेलर कार बनविली आहे. या गाडीची नाेंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली आहे. एकदा चार्ज केल्यानंतर १ हजार किलाेमीटर धावणारी सर्वांत वेगवान ईव्ही असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. टेस्ट ट्रॅकवर कारची चाचणी घेण्यात आली. (वृत्तसंस्था)
‘सनस्विफ्ट७’
११ तास ५२ मिनिटांमध्ये प्रवास
वजन ५०० किलाेग्रॅम, ‘टेस्ला’पेक्षा ७५ टक्के कमी
दाेन वर्षांत कारची बांधणी पूर्ण
कारमध्ये दाेन जण बसू शकतात.
ऊर्जेचा वापर – ३.८ केडब्ल्यूएच
इतर ईव्ही - १५-२० केडब्ल्यूएच
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"