TVS ने लॉन्च केली स्वस्त इलेक्ट्रिक स्कूटर, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2024 09:14 PM2024-05-14T21:14:05+5:302024-05-14T21:14:52+5:30
TVS Electric Scooter: या स्कूटरमध्ये 5-इंच TFT स्क्रीन, 950W चार्जर, क्रॅश अलर्ट, टो अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशनसारखे फिचर्स मिळतील.
TVS iQube New Base Variant : भारतातील आघाडीची टू-व्हिलर ऑटोमोबाईल कंपनी TVS ने आपली लोकप्रिय इलेक्ट्रिक स्कूटर iQube चे नवीन बेस व्हेरियंट लॉन्च केले आहे. नवीन व्हेरिएंट लहान 2.2 kWh बॅटरी पॅकने सुसज्ज असून, त्याची किंमत 94,999 रुपये (एक्स-शोरुम) ठेवण्यात आली आहे. या EV स्कूटरच्या इतर व्हेरियंट्सची किंमत यापेक्षा जास्त आहे.
फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
नवीन बेस व्हेरियंटमध्ये 4.4kW हब-माउंटेड BLDC मोटर आहे, जी 140Nm टॉर्क जनरेट करते. ही मोटर 2.2 kWh बॅटरीमधून पॉवर घेते. ही बॅटरी इको मोडमध्ये 75 किमी आणि पॉवर मोडमध्ये 60 किमीची रेंज देण्यास सक्षम आहे. फास्ट चार्जरद्वारे याची बॅटरी 2 तासात 0 ते 80% पर्यंत चार्ज होऊ शकते. हे नवीन व्हेरिएंट दोन रंगांमध्ये उपलब्ध आहे. यात वॉलनट ब्राऊन आणि पर्ल व्हाइट रंग मिळतील.
या बेस व्हेरियंटची किंमत 94,999 रुपये आहे (एक्स-शोरूम, बंगळुरू), ज्यामध्ये EMPS सबसिडी आणि कॅशबॅक सामील आहे. ही किंमत फक्त 30 जून 2024 पर्यंत लागू असेल. स्कूटरच्या इतर फिचर्सबद्दल बोलायचे झाले तर, बेस व्हेरिएंटमध्ये 5-इंच TFT स्क्रीन, 950W चार्जर, क्रॅश अलर्ट, टो अलर्ट, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन, 30 लीटर स्टोरेज मिळते.
या iQube स्कूटरचे ST मॉडेल दोन बॅटरी पॅकसह येते, ज्यात 3.4kWh आणि 5.1kWh चा समावेश आहे. त्याच्या 3.4kWh व्हेरिएंटची किंमत 1.55 लाख रुपये (एक्स-शोरुम, बंगळुरू) आणि 5.1kWh व्हेरिएंटची किंमत 1.85 लाख रुपये (एक्स-शोरुम, बंगळुरू) आहे.
त्याचे 3.4kWh बॅटरी व्हेरिएंट सिंगल चार्जवर 100km ची रेंज आणि 78 kmph चा टॉप स्पीड देते. तर, 5.1kWh बॅटरी व्हेरिएंट सिंगल चार्जवर 150km ची रेंज आणि 82km प्रति तासाचा टॉप स्पीड देऊ शकते.