११ हजारांपेक्षा अधिक स्वस्त झाली TVS ची इलेक्ट्रीक स्कूटर; पाहा डिटेल्स
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 05:44 PM2021-06-16T17:44:55+5:302021-06-16T17:47:57+5:30
Electric Vehicles : सध्या अनेकांचा कल हा इलेक्ट्रिक गाड्यांकडे वाढत असल्याचं दिसून येत आहे. नुकतंच सरकारनं इलेक्ट्रिक गाड्यांवरील अनुदानही वाढवलं होतं.
TVS नं आपल्या इलेक्ट्रिक स्कूटरच्या किंमतीत ११ हजार रूपयांपेक्षा अधिकची कपात केली आहे. ही TVS Motors ची iQube इलेक्ट्रिक स्कूटर आहे. टीव्हीएसनं स्टर अडॉप्शन अँड मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स इन इंडिया या स्कीममध्ये करण्यात आलेल्या बदलांनंतर गाड्यांची किंमत कमी केली आहे. प्राईज रिव्हाईज झाल्यानंतर या स्कूटरच्या किंमतीत ११,२५० रूपयांची कपात झाली आहे.
टीव्हीएसची ही स्कूटर सध्या केवळ दिल्ली आणि बंगळुरूमध्ये उपलब्ध आहे. दिल्लीत आता या कपातीनंतर iQube या स्कूटरची किंमत १.०१ लाख रूपये इतकी झाली आहे. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये या स्कूटरची किंमत ऑन रोड १.१० लाख रूपये झाली. दरम्यान, दिल्ली सरकार इलेक्ट्रिक गाड्यांवर अतरिक्त अनुदान देत आहे. गेल्या महिन्यात कंपनीनं घोषणा करत लवकरच ही स्कूटर २० पेक्षा अधिक शहरांमध्ये उपलब्ध होणार असल्याचं म्हटलं होतं.
iQube इलेक्ट्रिक स्कूटर ही बजाज चेतकच्या तुलनेत ४० हजार रूपयांनी स्वस्त आहे. बजाज चेतक स्कूटर Urbane आणि Premium या दोन व्हेरिअंटमध्ये येते. याची किंमत अनुक्रमे १.४३ लाख आणि १.४५ लाख रूपये इतकी आहे. TVS iQube मध्ये 4.4kW ची इलेक्ट्रिक मोटर देण्यात आली आहे. तसंच या स्कूटरचा टॉप स्पीड ७८ किलोमीटर प्रति तास आहे.