TVS iQube इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; जाणून घ्या किंमत आणि रेंज...
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2021 05:15 PM2021-02-06T17:15:52+5:302021-02-06T17:17:50+5:30
TVS iQube electric scooter: भारतीय बाजारात टीव्हीएसच्या या स्कूटरची स्पर्धा Bajaj Chetak आणि Ather च्या इलेक्ट्रीक स्कूटरसोबत होणार आहे.
दुचाकीमध्ये आणि खासकरून स्कूटर सेगमेंटमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या टीव्हीएस (TVS Motor Company) ने iQube इलेक्ट्रीक स्कूटर दिल्लीमध्ये लाँच केली. सुरुवातीला ही स्कूटर काही मोजक्याच डिलरकडे मिळणार आहे. टीव्हीएसने या स्कूटरला 3 वर्षे किंवा 50000 किमींची वॉरंटी दिली आहे. कंपनी ही स्कूटर लवकरच देशातील अन्य शहरांतही उपलब्ध करणार आहे. (TVS iQube electric scooter launched in delhi after bengluru)
भारतीय बाजारात टीव्हीएसच्या या स्कूटरची स्पर्धा Bajaj Chetak आणि Ather च्या इलेक्ट्रीक स्कूटरसोबत होणार आहे.
TVS iQube ची दिल्लीतील किंमत 1,08,012 रुपये आहे. या स्कूटरची एक्स-शोरुम किंमत 1,36,077 रुपये आहे. मात्र,FAME स्कीम आणि दिल्ली सरकार देत असलेली सबसिडी पाहता ही स्कूटर लाखाच्या आसपास जाणार आहे. TVS ने ही स्कूटर आधी बंगळुरूपुरतीच लाँच केली होती. याठिकाणी तिची किंमत 1,15,000 रुपये होती. कोरोना काळात ग्राहकांनी चांगला प्रतिसाद दिल्याचा दावा टीव्हीएसने केला आहे.
E-Scooter Mileage TIPS: इलेक्ट्रीक स्कूटरची रेंज कशी वाढवाल? ही काळजी घ्या...
बॅटरी आणि रेंज
टीव्हीएसच्या आयक्यूबला 4.4 kW ची मोटर देण्यात आली आहे. ही मोटर स्कूटरला 4.2 सेकंदांत 40 किमी प्रति तासाचा वेग देते. या स्कूटरची टॉप स्पीड 78 किमी प्रति तास आहे. यामध्ये 2.25kWh ची क्षमतेची lithium-ion बॅटरी देण्यात आली आहे. एकदा फूल चार्ज केल्यावर ही स्कूटर एकावेळी 75 किमी धावू शकते. ही स्कूटर चार्ज करण्यासाठी 5 तास लागतात.
मॅन्युअल गिअरची कार चालविताना या चुका करू नका; नाहीतर होईल मोठे नुकसान...
या स्कूटरमध्ये टीव्हीएसने जेनरेशन TVS SmartXonnect दिली आहे. यामध्ये अॅडव्हान्स टीएफटी क्लस्टर आणि टीव्हीएस आयक्यूब अॅपही मिळते. याद्वारे जिओ फेसिंग, नेव्हिगेशन असिस्ट, रिमोट बॅटरी चार्ज स्टेटस. लास्ट पार्क लोकेशन, कॉल अलर्ट, तसेच डेनाईट डिस्प्ले, क्यू पार्क असिस्ट, मल्टी सिलेक्ट इकॉनमी आणि पॉवर मोड सारखेच फिचर देण्यात आले आहेत.
इलेक्ट्रीक वाहन घेण्याचे फायदेच अधिक; तोटे फक्त २...जाणून घ्या...