'ही' स्वस्त भारतीय इलेक्ट्रिक स्कूटर घेण्यासाठी लोकांची गर्दी! 50 हजारांहून अधिक विक्री; जाणून घ्या किंमत...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 11:49 AM2023-01-26T11:49:47+5:302023-01-26T11:50:08+5:30
tvs iqube electric scooter : केवळ गेल्या डिसेंबर 2022 मध्ये स्कूटरच्या 11 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली, जो स्कूटरच्या विक्रीतील सर्वाधिक आकडा आहे.
नवी दिल्ली : टीव्हीएस (TVS) मोटर कंपनीने जानेवारी 2020 मध्ये iQube ई-स्कूटर लाँच करून इलेक्ट्रिक मोबिलिटी सेगमेंटमध्ये पाऊल ठेवले आहे. स्कूटर गेल्या वर्षी (2022) मध्ये अपडेट करण्यात आली, ज्यामुळे ती अधिक आकर्षक बनली आणि तिची मागणी वाढली. नवीन TVS iQube च्या विक्रीने मे 2022 पासून डिसेंबर 2022 पर्यंत आठ महिन्यांत 50,000 युनिट्सचा आकडा पार केला आहे. केवळ गेल्या डिसेंबर 2022 मध्ये स्कूटरच्या 11 हजारांहून अधिक युनिट्सची विक्री झाली, जो स्कूटरच्या विक्रीतील सर्वाधिक आकडा आहे.
TVS iQube जानेवारी 2022 मध्ये 1,529 युनिट्स विकल्या, फेब्रुवारी 2022 मध्ये 2,238 युनिट्स विकल्या , मार्च 2022 मध्ये 1,799 युनिट्सची विक्री करण्यात आली. तर एप्रिल 2022 मध्ये 1,420 युनिट्स विकल्या, मे 2022 मध्ये 2,637 युनिट्स विकल्या, जून 2022 मध्ये 4,668 युनिट्स विकल्या, जुलै 2022 मध्ये 6,304 यूनिट्स स्कूटरची विक्री झाली. तसेच, ऑगस्ट 2022 मध्ये 4,418 युनिट्स विकल्या गेल्या, सप्टेंबर 2022 मध्ये 4,923 युनिट्स, ऑक्टोबर 2022 मध्ये 8,103 युनिट्स, नोव्हेंबर 2022 मध्ये 10,056 युनिट्स आणि डिसेंबर 2022 मध्ये 11,071 युनिट्स विकल्या गेल्या.
जर आपण संपूर्ण वर्ष 2022 बद्दल बोललो, तर वर्षभरात TVS iQube चे सुमारे 60,000 युनिट्सची विक्री झाली आहे. TVS iQube ई-स्कूटर स्टँडर्ड, एस आणि एसटी या तीन व्हेरिएंटमध्ये सादर करण्यात आली आहे. सँडर्ड आणि एस व्हेरिएंटमध्ये 3.04 kWh लिथियम-आयन बॅटरी पॅक मिळतो तर टॉप-स्पेक एसटी मॉडेलला 4.56 kWh बॅटरी युनिट मिळते. तसेच, सिंगल फूल चार्जवर अनुक्रमे 100 किमी, 100 किमी आणि 145 किमीची कमाल रेंज देऊ शकते, असा दावा कंपनीकडून केला जात आहे.
TVS iQube च्या स्टँडर्ड व्हेरिएंटची किंमत सध्या 99,130 रुपये आहे तर 'एस' व्हेरिएंटची किंमत 1.04 लाख रुपये आहे. या ऑन-रोड, दिल्लीमधील किमती आहेत. iQube एसटीच्या किमती अजून समोर आलेल्या नाहीत. पुढील महिन्यात एसटी लाँच होण्याची शक्यता आहे. TVS iQube ची स्पर्धा Ola S1, Ather 450X, Bajaj Chetak, Hero Vida V1 या स्कूटर्ससोबत होत आहे.