टीव्हीएसची नवीन इलेक्ट्रीक स्कूटर लाँच; किंमत एवढी की ओलाच्या दोन स्कूटर येतील
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2023 10:01 AM2023-08-24T10:01:04+5:302023-08-24T10:01:26+5:30
TVS X Electric Scooter Features, Price: टीव्हीएस मोटर्सने एक्स ही दुसरी ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. आयक्युब नंतर ही दुसरी महागडी स्कूटर आहे.
एकीकडे ओला एका मागोमाग एक हायफाय इलेक्ट्रीक स्कूटर लाँच करत असताना टीव्हीएसने दुसरी इलेक्ट्रीक स्कूटर लाँच केली आहे. ही एवढी प्रिमिअम आहे की या किंमतीत ओलाच्या दोन स्कूटर येतील आणि वर पैसेही उरतील अशी आहे. एकतर लोक इंधनावरील पैसे वाचविण्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटर घेत आहेत, मग एवढे पैसे घालून कोण ही स्कूटर घेणार असा प्रश्न उपस्थित होत आहे.
टीव्हीएस मोटर्सने एक्स ही दुसरी ईलेक्ट्रीक स्कूटर बाजारात आणली आहे. आयक्युब नंतर ही दुसरी महागडी स्कूटर आहे. या एक्स स्कुटरमध्ये टिल्ट ऍडजस्टमेंटसह 10.2-इंच TFT टचस्क्रीन देण्यात आली आहे. याशिवाय क्रूझ कंट्रोल, रिव्हर्स असिस्टंट, TVS स्मार्ट कनेक्ट कनेक्टेड फीचर्स, लाइव्ह व्हिडिओ स्ट्रीमिंग, ऑन बोर्ड गेम्स, वेब ब्राउझर, लाइव्ह लोकेशन शेअरिंग, कीलेस, एलईडी हेडलाइट, सिक्वेन्शियल इंडिकेटर्स, अँटी थेफ्ट अलार्म सारखे फीचर्स देण्यात आले आहेत.
X इलेक्ट्रिक स्कूटरमध्ये कंपनीने दिलेली मोटर 11 kW ची पॉवर जनरेट करते. ही स्कूटर 2.6 सेकंदात शून्य ते 40 किमीचा वेग पकडू शकते. टॉप स्पीड 105 किलोमीटर प्रति तास इतका आहे. स्कूटरमध्ये 4.44 kWh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी १४० किमीची रेंज देत असल्याचा दावा कंपनीने केला आहे. बॅटरी 50 मिनिटांत 50 टक्क्यांपर्यंत चार्ज होऊ शकते आणि शून्य ते 80 टक्के चार्ज होण्यासाठी 4.30 तास लागतात.
या स्कूटरची किंमत कंपनीने बंगळुरूमध्ये एक्स शोरुम 2.50 लाख रुपये ठेवली आहे. म्हणजे इतर सगळा खर्च पकडून ही स्कूटर जवळपास २.७०-२.८० लाखा पर्यंत जाण्याची शक्यता आहे. या खर्चात ओलाची एक कमी किंमतीची आणि एक टॉप व्हेरिअंटची स्कूटर आरामात येऊ शकते. किंवा दोन कमी किंमतीतील म्हणजे ओला एस१ च्या स्कूटर आणि वर पैसेही उरणार आहेत.
शिवाय एवढे पैसे मोजून स्कूटरची रेंज १४० किमीच आहे, ती देखील ओलाच्या सर्वाधिक किंमतीच्या एस१ प्रो नव्या जेन२ पेक्षा जवळपास ५५ किंमींनी कमी आहे.