TVS ची युरोपमध्ये मोठी झेप; रोख पैसे मोजून घेतली स्वित्झर्लंडची सर्वात मोठी E-Bike कंपनी SEMG
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 05:41 PM2022-01-28T17:41:15+5:302022-01-28T17:41:40+5:30
TVS कंपनीनं घेतली मोठी झेप. यापूर्वीही काही ब्रँड्सचं केलं होतं अधिग्रहण.
टीव्हीएस मोटर कंपनी (TVS Motor Company) नं गुरुवारी एक मोठी घोषणा केली. कंपनीनं स्विस ई-मोबिलिटी ग्रुप एसईएमजी (Swiss E-Mobility Group) मध्ये ७५ टक्के हिस्सा खरेदी करत त्याचं अधिग्रहण केल्याची माहिती देण्यात आली. या अधिग्रहणाद्वारे कंपनी नॉर्टन मोटरसायकल (Norton Motorcycles) आणि ईजीओ मुव्हमेंटसह (EGO Movement) प्रीमियम आणि टेक्नोलॉजीतील मोठ्या ब्रँडद्वारे युरोपमध्ये विस्ताराच्या विचारात आहे. याकंपन्यांचंही TVS नं नुकतंच अधिग्रहण केलं होतं.
SEMG ही DACH क्षेत्रातील ई-मोबिलिटी सोल्यूशन्स पुरवरणारी आघाडीची कंपनी आहे. कंपनी स्वित्झर्लंडमधील सर्वात मोठी मोठी प्लोअर प्ले ई बाईक (pure-play e-bike) रिटेल चेन M-way चालवते. याचा महसूल जवळपास १०० मिलियन अमेरिकी डॉलर्स इतका आहे. कंपनीकडे एकापेक्षा एक प्रतिष्ठित स्विस मोबिलिटी ब्रान्ड पोर्टफोलिओ आहेत. यामध्ये Cilo, Simpel, Allegro आणि Zenith बाइक्सचा समावेश आहे.
इलेक्ट्रीक वाहनांत गुंतवणूक
“TVS मोटर नेहमीच स्थिरतेसाछी वचनबद्ध आहे आणि १० वर्षांहून अधिक काळ इलेक्ट्रीक वाहनांमध्ये गुंतवणूक करत आहे. पर्यावरण आणि वैयक्तिक जीवनमानावर वाढतं लक्ष नव्या मोबिलिटी सोल्युशन्सची मागणी तेजीनं वाढवत आहे. हे परिवर्तन घडवून आणण्यासाठी TVS मोटर गुंतवणूक करत आहे," अशी प्रतिक्रिया कंपनीचे अध्यक्ष वेणू श्रीनिवासन यांनी दिली.
रोख व्यवहार
ई-बाइक युरोपमध्ये पर्सनल मोबिलिटीचं वास्तविक रुप म्हणून समोर येत आहे. कारण वापरण्यास सुलभता, नियामक समर्थन आणि वाहतूक हे एकंदर कल्पनेचे कायमस्वरूपी स्वरूप आहे. ई-सायकलच्या बाजारपेठेत लक्षणीय वाढीची क्षमता आहे, सध्या युरोपमधील सायकल लोकसंख्येच्या सुमारे १५ टक्क्यांपर्यंत पोहोचत आहे आणि १८ टक्क्यांच्या सीएजीआरनं वाढण्यासोबतच ई सायकल बाजारासाठी महत्त्वपूर्ण विकास क्षमता आहे.