फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2022 03:33 PM2022-06-18T15:33:04+5:302022-06-18T15:33:46+5:30

tvs motor : ऑटो एक्स्पो 2018 मध्ये कंपनीने दाखवलेल्या Zeppelin Cruiser Bike मध्ये 220cc इंजिन होते. हे 20 hp पॉवर आणि 18.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे.

tvs motor launch zeppelin cruise bike on 6th july know details | फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!!

फक्त 18 दिवसांची प्रतीक्षा! TVS लॉन्च करणार 'ही' शानदार बाईक!!

Next

नवी दिल्ली :  टीव्हीएस (TVS) मोटर कंपनी आपली आणखी एक शानदार बाईक लॉन्च करण्यासाठी सज्ज आहे. आतापर्यंत कंपनीने आपल्या या नवीन बाईकबद्दल मीडियाला जास्त माहिती दिली नाही. मात्र, 6 जुलै रोजी ही शानदार बाईक लॉन्च करू शकते, हे स्पष्ट झाले आहे.

सूत्रांचे म्हणणे आहे की ,कंपनी एकतर 6 जुलै रोजी Apache RR 310 ची नवीन आवृत्ती लॉन्च करू शकते किंवा आपली क्रूझर बाइक Zeppelin सुद्धा बाजारात आणू शकते. मीडियामध्ये Zeppelin बद्दल फारशी माहिती नसली तरी अनेक वर्षांपूर्वी कंपनीने क्रूझर कन्सेप्ट बाईक सादर केली होती आणि आता कंपनी ती Zeppelin म्हणून लॉन्च करणार असल्याचे म्हटले जात आहे.

पॉवरफुल असेल TVS Zeppelin
ऑटो एक्स्पो 2018 मध्ये कंपनीने दाखवलेल्या Zeppelin Cruiser Bike मध्ये 220cc इंजिन होते. हे 20 hp पॉवर आणि 18.5 Nm पीक टॉर्क जनरेट करते. हे 5-स्पीड गिअरबॉक्सशी जोडलेले आहे. तर त्याचा टॉप-स्पीड 130kmph आहे. यावेळी बाईकमध्ये इलेक्ट्रिक बूस्ट सिस्टीम असण्याची अपेक्षा आहे. यामध्ये 48V लिथियम-आयन बॅटरी आहे, जी 1200W रीजनरेटिव्ह मोटरला पॉवर देण्याचे काम करेल. यामुळे या बाईकचे मायलेज अधिक चांगले राहील.

मिळू शकतील हे फीचर्स...
Zeppelin मध्ये ग्राहक क्रूझर बाईकसह स्पोर्टी बाईक राईडचा आनंद घेऊ शकतात, कारण याला नेहमीच्या क्रूझर बाईकपेक्षा वेगळा फ्लॅट हँडलबार मिळू शकतो. तसेच, नवीन प्रकारचे टी-शेप हेडलाइट, एलईडी डीआरएल देखील यामध्ये मिळू शकतात. बाईकला एलॉयच्याऐवजी काळ्या रंगात स्पोक व्हील मिळू शकते. त्याची किंमत 1.60 लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते आणि बाजारात ही बाईक बजाज अॅव्हेंजर 220 क्रूझला (Bajaj Avenger 220 Cruise) टक्कर देऊ शकते.

Web Title: tvs motor launch zeppelin cruise bike on 6th july know details

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.