TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार 

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 03:50 PM2021-10-05T15:50:15+5:302021-10-05T15:52:08+5:30

TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India : या भागीदारीचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पित इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे आहे.

TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India | TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार 

TVS ची Tata Power सोबत भागीदारी; देशात ईव्ही चार्जिंग स्टेशन बसवणार 

googlenewsNext

नवी दिल्ली : देशातील प्रमुख दुचाकी आणि तीन चाकी वाहन निर्मिती टीव्हीएस मोटर कंपनीने (TVS Motor Company)  भारतातील सर्वात मोठ्या इंटीग्रेटेड वीज कंपन्यांपैकी एक असलेल्या टाटा पॉवरसोबत (Tata Power) धोरणात्मक भागीदारी केली आहे. दोन्ही कंपन्यांनी सामंजस्य करार केला आहे. ज्या अंतर्गत त्यांनी संपूर्ण भारतात इलेक्ट्रिक व्हेइकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर (EVCI) ला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देण्यास आणि टीव्हीएस मोटरच्या ठिकाणी सौर ऊर्जा तंत्रज्ञान स्थापित करण्यास सहमती दर्शविली आहे. (tvs motor company signs mou with tata power to collaborate on electric two wheeler charging eco system in india)

या भागीदारीचे उद्दिष्ट भारतातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला गती देण्यासाठी मोठ्या प्रमाणात समर्पित इलेक्ट्रिक दुचाकी चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर तयार करणे आहे. यामुळे TVS iQube च्या (टीव्हीएस  आयक्यूब)  इलेक्ट्रिक स्कूटरच्या ग्राहकांना टीव्हीएस मोटर कस्टमर कनेक्ट अॅप आणि टाटा पॉवर EZ चार्ज अॅपद्वारे संपूर्ण भारतभर टाटा पॉवरद्वारे व्यापक चार्जिंग नेटवर्कमध्ये प्रवेश मिळेल.

भागीदारीचा हेतू आहे की इलेक्ट्रिक दुचाकींसाठी नियमित एसी चार्जिंग नेटवर्क आणि डीसी फास्ट-चार्जिंग नेटवर्क तयार करणे. या भागीदारीमुळे देशातील दुचाकी ग्राहकांना इलेक्ट्रिक वाहनांकडे वळवण्यास मदत होईल. जागतिक हवामान बदलामुळे वाढत्या चिंतांमुळे, आगामी काळात सौर ऊर्जा महत्वाची भूमिका बजावेल. सौर ऊर्जेमध्ये तंत्रज्ञानाचा विस्तार ग्राहकांद्वारे स्वच्छ ऊर्जा घेण्याच्या दिशेने बदलण्यात महत्वाची भूमिका बजावेल. या उद्दिष्टासह, दोन्ही कंपन्या सौर उर्जेचा वापर करून टिव्हीएस मोटरच्या निवडक स्थानांना वीज देण्याच्या संधी शोधतील.

टीव्हीएस मोटर कंपनीने एका प्रेस नोटमध्ये म्हटले आहे की, ग्राहकांना ग्रीन व्हेइकल देण्यात कंपनी आघाडीवर आहे. टीव्हीएस मोटर कंपनीचे सहव्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू म्हणाले, "टाटा पॉवरसोबतची ही भागीदारी देशाच्या हरित भविष्यासाठी आणखी एक महत्त्वाचा टप्पा आहे. आमची भागीदारी जागतिक दर्जाच्या फास्ट-चार्जिंग सोल्यूशन्सद्वारे आहे ग्राहकांची सुविधा मोठ्या प्रमाणात वाढवेल. देशातील व्यापक आणि शाश्वत चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर बांधण्यात अग्रणी असलेल्या टाटा पॉवरसोबत अग्रणी भागीदार म्हणून टीव्हीएस मोटर अत्यंत उत्साहित आणि अभिमानास्पद आहे. टीव्हीएस मोटरच्या विद्युतीकरणाच्या दृष्टीकोनाच्या अनुषंगाने, आम्ही भारतभरातील दुचाकी आणि तीन चाकी ईव्ही ग्राहकांसाठी एक विस्तृत आणि विश्वासार्ह चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चरची कल्पना करतो, जे सौरसारख्या उर्जा स्त्रोतांद्वारे समर्थित आहे. "

दरम्यान, टाटा पॉवरसोबत कंपनीचा सामंजस्य करार पुढील काही महिन्यांत TVS iQube Electric ची उपस्थिती 25 हून अधिक शहरांमध्ये वाढवण्याच्या वचनबद्धतेनुसार आहे. TVS iQube इलेक्ट्रिक स्कूटर सध्या दिल्ली, बंगलोर, चेन्नई, पुणे, कोची, कोईम्बतूर, हैदराबाद, सूरत, विझाग, जयपूर आणि अहमदाबाद येथे उपलब्ध आहे.

Web Title: TVS Motor, Tata Power in pact to create EV charging infrastructure in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.