TVS Radeon देतेय 80 किमीपर्यंत मायलेज, सणासुदीच्या काळात नवीन कलरमध्ये लाँच

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 04:54 PM2021-10-23T16:54:48+5:302021-10-23T16:58:11+5:30

TVS Radeon Launched In New Colours : कंपनीने लाल आणि काळ्यासह निळ्या आणि काळ्या कलरच्या ड्युअल टोन ऑप्शनमध्ये TVS Radeon बाईक लाँच केली आहे.

TVS Radeon Launched In New Colours For Festive Season, Check New Prices Here | TVS Radeon देतेय 80 किमीपर्यंत मायलेज, सणासुदीच्या काळात नवीन कलरमध्ये लाँच

TVS Radeon देतेय 80 किमीपर्यंत मायलेज, सणासुदीच्या काळात नवीन कलरमध्ये लाँच

googlenewsNext

दिवसेंदिवस पेट्रोलच्या किंमतीत वाढ होताना दिसून येत आहे. या परिस्थितीत जर तुम्हाला एक लिटर पेट्रोलमध्ये 80 किमीपर्यंत जाण्याची क्षमता असलेली बाईक मिळाली आणि तिची किंमत देखील कमी असेल तर नक्कीच ही एक दिलासादायक बाब होईल. दुचाकी कंपनी TVS Motor ने दावा केला आहे की, कंपनीची TVS Radeon बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 80 किमीपर्यंतचे मायलेज देते. आता कंपनीने या सणासुदीत दोन नवीन ड्युअल टोन कलरमध्ये ही बाईक लॉन्च केली आहे. (TVS Radeon launched in new colours for festive season)

TVS Radeon ला नवीन कलर
कंपनीने लाल आणि काळ्यासह निळ्या आणि काळ्या कलरच्या ड्युअल टोन ऑप्शनमध्ये TVS Radeon बाईक लाँच केली आहे. याशिवाय बाईकमध्ये अजून कोणतेही बदल करण्यात आलेले नाहीत. हे दोन्ही नवीन ड्युअल टोन कलर बाईकच्या इंधन टाकीवर दिसतील. याशिवाय, त्याचा हेडलॅम्प केवळ बॉडी कलरचा असेल. बाईकच्या साइड पॅनलवर ड्युअल टोन टच देखील असेल. दुसरीकडे, इंजिनवरील गोल्डन टच आणि अलॉय व्हील्स देखील काळ्या कलरच्या ऑप्शनमध्ये उपलब्ध असतील.

TVS Radeon मध्ये दमदार इंजिन 
TVS Radeon ही 110cc सेगमेंट बाईक आहे. यात BS-6 अनुरूप 109.7cc सिंगल सिलेंडर एअर-कूल्ड इंजिन आहे. हे 8.08 PS पॉवर आणि 8.7 Nm कमाल टॉर्क जनरेट करते. यात 4-स्पीड गिअरबॉक्स आहे.

TVS Radeon बाईकचे मायलेज
TVS Motor चा दावा आहे की,  कंपनीची TVS Radeon ही कमी किमतीची बाईक आहे आणि जास्त मायलेज देते. कंपनीचे म्हणणे आहे की, ही बाईक एक लिटर पेट्रोलमध्ये 79.3 किमी मायलेज देते. दिल्लीमध्ये ड्युअल टोन ड्रम व्हेरिएंटची एक्स-शोरूम किंमत जवळपास 69,000 रुपयांपासून सुरू होते आणि डिस्क व्हेरिएंटची किंमत सुमारे 72,000 रुपये आहे.

Web Title: TVS Radeon Launched In New Colours For Festive Season, Check New Prices Here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन