बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'ही' लिस्ट पाहा...

By ऑनलाइन लोकमत | Published: March 8, 2023 06:46 PM2023-03-08T18:46:44+5:302023-03-08T22:10:15+5:30

भारतीय बाजारपेठेत बजाजने चेतक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचे 2023 व्हेरिएंट 1,51,910 रुपयांमध्ये आणले आहे.

two wheeler bikes and scooters list see here bike and scooter | बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'ही' लिस्ट पाहा...

बाईक किंवा स्कूटर खरेदी करण्याचा विचार करताय? मग 'ही' लिस्ट पाहा...

googlenewsNext

नवी दिल्ली :  भारतीय बाजारपेठेत एकापेक्षा जास्त वाहने लाँच होतात, जी लोकांना खूप आवडतात. जर तुम्ही स्वतःसाठी नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी बाईक आणि स्कूटरची लिस्ट घेऊन आलो आहोत. या लिस्टमध्ये कोणत्या स्कूटर आणि बाईकचा समावेश आहे, ते पाहूया...

2023 Bajaj Chetak Premium
भारतीय बाजारपेठेत बजाजने चेतक प्रीमियम इलेक्ट्रिक स्कूटरचे 2023 व्हेरिएंट 1,51,910 रुपयांमध्ये आणले आहे. 2023 च्या अपडेटमध्ये एक मोठा आणि अधिक शक्तिशाली इन्स्ट्रुमेंट कन्सोल आणि 2023 साठी तीन नवीन कलर ऑप्शन (मॅट मोटे ग्रे, मॅट कॅरिबियन ब्लू आणि सॅटिन ब्लॅक) मिळतात. याव्यतिरिक्त, चेतकला टू-टोन सीट्स, बॉडी कलरचे रियर व्ह्यू मिरर आणि सॅटिन ग्रॅब रेल मिळतात. तसेच, अगदी हेडलाइट केसिंग आणि ब्लिंकर्स सुद्धा चारकोल ब्लॅकमध्ये येते.

Matter Aera electric motorcycle
अहमदाबादस्थित इलेक्ट्रिक वाहन निर्माता कंपनीने भारतात आपली पहिली बाईक ऐरा इलेक्ट्रिक लाँच केली आहे. या बाईकची किंमत 1.43 लाख आहे आणि Aera 4000, Aera 5000, Aera 5000+ आणि Aera 6000+ या चार ट्रिममध्ये उपलब्ध असणार आहे. Aer 5000 रेंज सिंगल 10kW मोटरद्वारे संचालित आहे आणि लिक्विड-कूल्ड 5kWh बॅटरी आहे, जी जास्तीत जास्त 125km रेंज देते. यासह, मॅटर कंपनीचा दावा आहे की, नियमित चार्जर सेटअप वापरून बॅटरी पाच तासांत पूर्णपणे चार्ज केली जाऊ शकते.

TVS Ronin बेस्ड कस्टम प्रोजेक्ट्स
या वर्षीच्या गोव्यातील मोटोसोल इव्हेंटमध्ये, TVS ने वेगवेगळ्या डिझाईन हाउसद्वारे तयार केलेल्या चार Ronin बेस्ड कस्टम प्रोजेक्ट्सचे अनावरण केले आहे. यामध्ये TVS डिझाईन टीमद्वारे एससीआर, जर्मनी स्थित जेव्हीबी मोटोद्वारे एगोंडा, राजपुताना कस्टमद्वारे वाकीझाशी आणि इंडोनिशियामधील स्मोक्ड गॅराजद्वारे मुशीशी यांचा समावेश आहे.

Suzuki 2023 साठी आपल्या स्कूटरला केले अपडेट
भारतीय बाजारपेठेत सुझुकी आजपासूनच नाही तर अनेक वर्षांपासून लोक तिला पसंत करत आहेत. Suzuki ने भारतात Access 125, Burgman Street 125 आणि Avenis 125 स्कूटरचे 2023 व्हेरिएंट लाँच केले आहेत. या स्कूटर्सची किंमत 79,400 रुपये, 93,000 रुपये आणि 92,000 रुपयांपासून सुरू होते. या स्कूटर्समध्ये फक्त OBD2-A आणि E20 इंधन वापरले जाते.

Web Title: two wheeler bikes and scooters list see here bike and scooter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.