'या' भारतीय कंपनीने आणली 5.60 लाखांची इलेक्ट्रिक बाईक, टॉप स्पीड 150 किमी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 22, 2023 02:27 PM2023-08-22T14:27:31+5:302023-08-22T14:27:54+5:30

नवीन अल्ट्राव्हॉयलेट F77 स्पेस एडिशन बाईक अनेक युनिक एलिमेंट्ससह मिळणार आहे.

Ultraviolette F77 Space Edition launched at Rs 5.60 lakh | 'या' भारतीय कंपनीने आणली 5.60 लाखांची इलेक्ट्रिक बाईक, टॉप स्पीड 150 किमी

'या' भारतीय कंपनीने आणली 5.60 लाखांची इलेक्ट्रिक बाईक, टॉप स्पीड 150 किमी

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतातील प्रिमियम इलेक्ट्रिक टू-व्हीलर उत्पादक अल्ट्राव्हॉयलेटने F77 इलेक्ट्रिक बाईकचे नवीन स्पेशल 'स्पेस एडिशन' लाँच केले आहे. नवीन मॉडेल टॉप व्हेरिएंट म्हणून बाजारात आणण्यात आले आहे. बाईकची किंमत 5.60 लाख रुपये आहे. नवीन अल्ट्राव्हॉयलेट F77 स्पेस एडिशन बाईक F77 रेकॉन बाईकपेक्षा सुमारे 95,000 रुपये महाग आहे. नवीन अल्ट्राव्हॉयलेट F77 स्पेस एडिशन बाईक अनेक युनिक एलिमेंट्ससह मिळणार आहे.

नवीन एडिशनचे उत्पादन केवळ 10 युनिट्सपर्यंत मर्यादित आहे. नवीन स्पेस एडिशन बाईक एका विशेष पांढर्‍या पेंट स्कीमसह आली आहे, ज्याबद्दल अल्ट्राव्हॉयलेट कंपनीचा दावा आहे की, 'ड्रॅगला कमी करून एफिशिएंसीमध्ये योगदान देते'. कंपनीने बाईकवर अनेक ठिकाणी स्पेशल एडिशनचे बॅजिंग दिले आहे. नवीन बाईकच्या चार्जिंग पोर्ट फ्लॅपवर नंबर लिहिलेले असतील.

अल्ट्राव्हॉयलेट इंडियाने F77 स्पेस एडिशनमध्ये नवीन टँक ग्राफिक्स आणि नवीन एरोडायनामिक व्हील कव्हर देखील जोडले आहेत. बाईकची चावी एरोस्पेस ग्रेड अॅल्युमिनियमचा सिंगल ब्लॉक वापरून तयार केला आहे. तसेच, या बाईकसाठी Pirelli Diablo Rosso II रबर टायर्स देण्यात आले आहेत. तर स्टँडर्ड मॉडेलला एमआरएफ स्टील ब्रेस टायर्स येतात. 

बॅटरी, रेंज आणि मोटर
स्पेस एडिशनला 10.3kWh बॅटरी पॅक मिळेल, जो सिंगल चार्जवर 307 किमीची रेंज देईल. रेंजचे आकडे F77 च्या टॉप-स्पेक रिकॉन व्हेरिएंटसारखेच आहेत. मात्र, इलेक्ट्रिक मोटरचे पीक आउटपुट आकडे वेगळे आहेत.  F77 स्पेस एडिशन 40.5hp आणि 100Nm जनरेट करते, जे F77 च्या लिमिटेड एडिशन व्हेरिएंट (किंमत 5.50 लाख रुपये) प्रमाणेच आहे. या बाईकचा टॉप स्पीड सुमारे 150KM आहे.

Web Title: Ultraviolette F77 Space Edition launched at Rs 5.60 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.