सुपरफास्ट 'मेड इन इंडिया' EV बाईक; 24 एप्रिलला होणार लॉन्च, पाहा किंमत अन् फिचर्स...
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2024 18:18 IST2024-04-06T18:17:13+5:302024-04-06T18:18:02+5:30
Ultraviolette Fastest Electric Bike: या EV बाईकची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे.

सुपरफास्ट 'मेड इन इंडिया' EV बाईक; 24 एप्रिलला होणार लॉन्च, पाहा किंमत अन् फिचर्स...
Ultraviolette Fastest Electric Bike: भारतातील आघाडीची इलेक्ट्रिक टू-व्हिलर मेकर कंपनी अल्ट्राव्हायोलेट (Ultraviolette) लवकरच आपली सर्वात वेगवान इलेक्ट्रिक बाईक लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 24 एप्रिल रोजी ही सुपरफास्ट बाईक लॉन्च करणार आहे. या बाईकचे नाव काय आहे, याचा अद्याप खुलासा झालेला नाही.
सध्या बाजारात कंपनीची अल्ट्राव्हायोलेट F77 इलेक्ट्रिक बाईकची विक्री सुरू आहे. या बाईकचा टॉप स्पीड सुमारे 140 किलोमीटर प्रति तास आहे. नवीन बाईकबद्दल सांगितले जात आहे की, तिचा वेग सध्याच्या मॉडेलपेक्षा जास्त असेल. विशेष म्हणजे अल्ट्राव्हायोलेट F77 ही आतापर्यंतची सर्वात वेगवान ई-बाईक आहे. ही बाईक फुल फेअरिंग स्पोर्ट्स डिझाइनमध्ये येते. नवीन बाईकदेखील अशाच डिझाइनमध्ये येण्याची अपेक्षा आहे.
काय असतील फिचर्स?
अल्ट्राव्हायोलेटच्या नवीन बाईकमध्ये पॉवरफूल मोटरसह F99 प्रोटोटाइपचे काही फिचरदेखील समाविष्ट केले जाऊ शकतात. नवीन बाईकवर डाउनफोर्स जनरेटिंग विंग्स दिसू शकतात. बाईकचे बाकीचे भाग, जसे की चेसिस, सस्पेन्शन, ब्रेक्स हे सध्याच्या मॉडेलसारखेच असण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार, Ultraviolette F77 ची एक्स-शोरूम किंमत 3.8 लाख ते 4.55 लाख रुपये आहे. आता नवीन सुपरफास्ट व्हर्जनची किंमत जास्त असू शकते.