UM Renegade Commando Classicची कार्बोरेटर व्हेरियंट भारतात लाँच
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2018 03:57 PM2018-12-08T15:57:58+5:302018-12-08T15:58:48+5:30
UM कंपनीने भारतात आपल्या Renegade Commando Classic ची कार्बोरेटर व्हेरियंट बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत भारतात 1.95 लाख रुपये (दिल्लीतील एका शोरुमध्ये) इतकी आहे.
नवी दिल्ली : UM कंपनीने भारतात आपल्या Renegade Commando Classic ची कार्बोरेटर व्हेरियंट बाईक लाँच केली आहे. या बाईकची किंमत भारतात 1.95 लाख रुपये (दिल्लीतील एका शोरुमध्ये) इतकी आहे.
UM आधीपासूनच Renegade Commando Classic च्या फ्यूल-इंडेक्टेड व्हेरियंट बाईकची भारतात विक्री करत आहे. या बाईकची किंमत 2.01 लाख आहे. दरम्यान, नवीन व्हेरियंट बाईकमध्ये कार्बोरेटरशिवाय आणखी काही बदल केले नाहीत. कंपनीने या सिस्टिमसोबत एबीएस सुद्धा ऑफर केलेली नाही. बाईकच्या नवीन कार्बोरेटर व्हेरियंट आपल्या Fi व्हेरियंटच्या तुलनेत कमी पॉवर आऊटपुट देईल.
Fi आणि नवीन कार्बोरेटर व्हेरियंटमध्ये 279.5 सीसी लिक्विड-कूल्ड सिंगल-सिलिंडर इंजिन आहे. Fi व्हेरियंटमध्ये 25.15bhp पॉवर आणि 23Nm चे पिक टॉर्क जेनरेट होते. तर कार्बोरेटर व्हेरियंटमध्ये 23.7bhp चे पॉवर आणि 23Nm चे पिक टॉर्क जेनरेट होते. दोन्ही व्हेरियंटमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स आहे. याचबरोबर, बाईकच्या फ्रंटला 280mm डिस्क आणि रिअरमध्ये 130mm ड्रम ब्रेक मिळणार आहे.
तसेच, UM Renegade Commando Classic च्या फीचर्समध्ये मस्क्यूलर फ्यूल टँक, राउंडेड हेडलाइट्स, टॉल विंडस्क्रीन आणि बॅक रेस्टसोबत स्प्लिट सीट्स दिली आहे.