डॅशबोर्ड पॅनेलवरील सांकेतिक चिन्हे व लाइट्सचे अर्थ समजून घेणे सर्वात महत्त्वाचे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 01:13 PM2017-10-16T13:13:57+5:302017-10-16T13:34:20+5:30

कार चालकाने आपल्या पुढे डॅशबोर्डवर असलेल्या इन्स्ट्रुमेंट पॅनेलवरील सांकेतिक दिव्यांची माहिती सतत ठेवली पाहिजे व त्याकडे लक्षही नीट ठेवले पाहिजे. त्यामुळे कारच्या विविध दोषांबाबत व समसस्येबाबत ताबडतोब निवारण करता येते

Understanding signals and lights on the dashboard panel is very important | डॅशबोर्ड पॅनेलवरील सांकेतिक चिन्हे व लाइट्सचे अर्थ समजून घेणे सर्वात महत्त्वाचे

डॅशबोर्ड पॅनेलवरील सांकेतिक चिन्हे व लाइट्सचे अर्थ समजून घेणे सर्वात महत्त्वाचे

googlenewsNext
ठळक मुद्देमहत्त्वाच्या चिन्हांना डॅशबोर्डवर असलेल्या इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये बसवण्यात आलेले असतेसाधारणपणे स्टिअरिंग व्हीलमागे असणारे हे पॅनेल त्यात वेग, किलोमीटर यांचे मीटर असताततसेच त्याचमध्ये काही लाइट्स असतात व ते त्यांच्या विशिष्ट चित्रामध्ये दिलेले असतात

कार वा वाहन यामध्ये ड्रायव्हरला अनेक बाबतीत कारच्या दोषांबाबत वा स्थितीबाबत सहज साधारणपणे कल्पना असतात, असाव्यात. मात्र प्रत्येक सचालकाला लयाची माहिती असते असे नाही. काहीजण अगदी कानावर इंजिनचा आवाज पडल्यानंतर त्यामध्ये काही दोष असेल तर तो ओळखू शकतात. अर्थात सर्वांनाच हे काही जमत नाही. प्रत्येक ड्रायव्हर हा काही इंजिनिअर वा मेकॅनिक नसतो. मात्र त्याला कारमधील दोषांबाबत, समस्येबाबत विशेष करून महत्त्वाच्या बाबतीत झटकन समजावे व त्याने त्यादृष्टीने सावध व्हावे यासाठी काही महत्त्वाच्या चिन्हांचा वापर करून त्यांना विशिष्ट पद्धतीने डॅशबोर्डवर असलेल्या इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये बसवण्यात आलेले असते.

साधारणपणे स्टिअरिंग व्हीलमागे असणारे हे पॅनेल त्यात वेग, किलोमीटर यांचे मीटर असतात. तसेच त्याचमध्ये काही लाइट्स असतात व ते त्यांच्या विशिष्ट चित्रामध्ये दिलेले असतात. त्यामध्ये निळा,केशरी, पिवळा व लाल हे रंग वापरून तुम्हाला त्याची माहिती होत असते. साधारणपणे यामध्ये काहीवेळा निळा असणारा लाइट लाल रंगामध्ये पेटतो, तर काही लाइट गाडी सुरू करताना इग्निशन दिल्यानंतर बंद होतात. मात्र त्यापैकी काही लाइट लागले की त्यात काही घोटाळा आहे असे समजवावे व त्यानुसार पुढील दोषनिवारणासाठी कार गॅरेजला न्यायची की नाही ते ठरवावे. सोबत दिलेल्या इन्स्ट्रुमेंट पॅनेलमध्ये त्याची माहिती दिली आहे.

इंजिन व संबंधित प्रणालीतील दोष असणे, ऑइल लेव्हल कमी असणे, प्रदूषण करणाऱ्या प्रमआलीबाबत दोष, इंधन भरण्याबाबत सूचना, दरवाजा उघडा आहे, सीटबेल्ट लावलेला नाही, डिझेल कारमघ्ये असणारी हीटर क्वॉइलचा दोष आहे, ब्रेक्सचा दोष आहे आदी विविध प्रकारच्या सूचना देणारे हे लाइट्स तुम्हाला या डॅशबोर्ड पॅनेलवर लागलेले दिसू शकतात.त्यामध्ये इंजिन विषयक, सुरक्षा विषयक, चालकाला मदत करणाऱ्या बाबींवर तसेच तेल,इंधन, हवेचा दाब, सर्व्हिसिंगची सूचना देणारे आदी विषयानुसार हे लाइट पेटत असतात.

त्यानुसार त्याची माहिती कार चालवणाऱ्याने लक्षात घेऊन त्यानुसार पुढील कारवाई केली पाहिजे. अगदी साधी बाब म्हणजे पेट्रोल व संपत आले असेल तर समोरच्या काट्याकडे त्याचे लक्ष असायला हवे. आज तरीही त्या स्थितीची जाणीव करून देणारा लाइट लागतो व तुम्हाला तो आता इंधन भरा याची जाणीव करून देतो. अशा प्रकारच्या विविध सूचना देणाऱ्या या पॅनेलवरील लाइटबाबत प्रत्येक कारच्या माहितीपुस्तकातही त्या त्या कारमध्ये दिलेल्या सांकेतिक चिन्हांची व लाइटबाबतची माहिती असते. प्रत्येकाने ती नजरेखालून घालून त्याचे महत्त्व जाणून घ्यायला हवे.

Web Title: Understanding signals and lights on the dashboard panel is very important

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.