कारमध्ये करा मऊशार डोअरमॅटचा अनोखा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2017 11:51 AM2017-10-03T11:51:53+5:302017-10-03T11:54:49+5:30

घराच्या दारात वापरले जाणारे विविध प्रकारचे डोअरमॅट्स कारमध्ये ड्रायव्हरच्या उपयोगासाठी वारपरता येऊ शकतात. अनवाणी पायाने ड्रायव्हिंग करणाऱ्यांना, कमी उंची असणाऱ्यांना त्याचा वापर कदाचित आवडूही शकतो. अर्थात हे प्रत्येक व्यक्तीच्या आवडीनिवडीवर व वापरावर अवलंबून असते

Unique use of door mat in the car | कारमध्ये करा मऊशार डोअरमॅटचा अनोखा वापर

कारमध्ये करा मऊशार डोअरमॅटचा अनोखा वापर

Next
ठळक मुद्देपारंपरिक रचना, पद्धती, टाकावूतून टिकावू करण्याची कला अशामधून तयार केलेले हे डोअरमॅट्स मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध आहेतडोअरमॅटचा वापर ड्रायव्हरच्या पाययाखाली असलेल्या रबरमॅटवर करायला हरकत नाहीड्रायव्हिंगमध्ये त्या डोअरमॅटच्या आकाराने,जाडीने अडथळा होता कामा नये, इतकी दक्षता घेतली तरी पुरे

घरामध्ये दरवाजापाशी पायपुसणे ठेवण्याची पद्धत आहे. इंग्रजीमध्ये ज्याला डोअरमॅट असा शब्द आहे. विविध प्रकारची डोअरमॅट्स आज वापरली जातात. काही डोअरमॅट्स तर औद्योगिक टाकावू वस्तूंपासून तयार केली जातात. उत्पादनामध्ये शिल्लक राहिलेल्या कचऱ्यापासूनही ती बनवली जातात. भारतामध्ये गालिचे तयार करणाऱ्या उद्योगांमध्ये शिल्लक असलेले कापडाचे भागही डोअरमॅट्स म्हणून वापरले जातात. तसेच काथ्यापासून व तागापासून तयार केलेले डोअरमॅट्सही भारतात विविध ठिकाणी दिसतात.

पारंपरिक रचना, पद्धती, टाकावूतून टिकावू करण्याची कला अशामधून तयार केलेले हे डोअरमॅट्स मोठ्या प्रमाणात बाजारामध्ये उपलब्ध आहेत. अनेकदा कारमध्ये वाहन चालवणाऱ्याला रबरमॅट वा कारच्या साधनसामग्रीमध्ये मानले गेलेले व स्वीकारले गेलेले मॅट्स यावरच समाधान मानावे लागते. वास्तविक रबर, प्लॅस्टिक काहींना मानवत नाही. तर त्यांची जाडी कमी असल्याने ते कार चालवताना काहींच्या पायाला त्यांचा स्पर्श मानवत नाही, तर काहींची उंची कमी असल्याने काहींना पायाखाली थोडी जाडी असणारी वस्तू ठेवावी लागते. अशा स्थितीत काहीजण चक्क लाकडाची फळीही पायाखाली ठेवतात. मात्र यामुळे ड्रायव्हिंग करताना एक्सलरेटर, ब्रेक, क्लच यांच्या पॅण्डलखाली ती फळी येण्याची शक्यता असते.त्यामुळे अशा परिस्थितीत डोअरमॅटचा वापर अतिशय चांगल्या पद्धतीने करता येऊ शकतो.

बाजारात विविध प्रकारचे डोअरमॅट मिळतात. त्यात कॉटन, काथ्या, ताग, रबर, प्लॅस्टिक,वेलवेच, कृत्रिम कापड यापासून तयार केलेल्या डोअरमॅटचा समावेश होतो. डोअरमॅटचा वापर ड्रायव्हरच्या पाययाखाली असलेल्या रबरमॅटवर करायला हरकत नाही. प्रत्येक डोअरमॅटच्या प्रकारांचे वैशिष्ट्य मात्र ते करीत असताना आपल्याला त्रास होणार नाही, ड्रायव्हिंग करताना अडथळाही ठरणार नाही, उंचीच्यादृष्टीने अधिक उंचही वाटणार नाही. अशा घटकांचा विचार करा. साधारण डोअरमॅटचा आकार हा ड्रायव्हरच्या पायाकाळी असलेल्या भागाचा विचार केला तर तेथे दोन डोअरमॅट बसू शकतात. ती रचना व त्याची आवश्यकता मात्र तुम्हीच ठरवायची असते. ते एकप्रकारे कस्टमायझेशन असते.

मात्र याचा फायदा आपल्याला कसा होईल ते पाहा. पावसाळ्यामध्ये कॉटनचे डोअरमॅट कामाचे नाही. ते ओले होऊन खराब होते. मऊशारपणा त्यात नक्की असला तरी वेलवेटचे वा गालिचाच्या स्पर्ष पायाला देणारे डोअरमॅटही पावसात खराब होऊ शकते, त्यात धूळही जाऊ शकते. रबराचे जाड मॅड पायाला चांगली संवेदना देऊ शकतही नाही. काहींना मोकळ्या पायांनी ड्रायव्हिंग करण्याची सवय असते. अशांसाठी कॉटन, गालिचा, ड्यूट यांची डोअरमॅट अधिक उपयोगी ठरू शकतात.तुम्चया पायांना एक्सलरेटर, ब्रेक, क्लच यांच्या उंचीनुसार आवश्यक अशी डोअरमॅट घेऊ शकता. तर काहींना मोकळ्या पायाने ड्रायव्हिंग करायचे असेल तर मऊशार कापडाचीही डोअरमॅट पाहू शकता. किंबहुना डोअरमॅटचा हा असा वापर करणे हे प्रत्येकाच्या आवडीनिवडीवर आहे. एक मात्र खरे की तुमच्या ड्रायव्हिंगमध्ये त्या डोअरमॅटच्या आकाराने,जाडीने अडथळा होता कामा नये, इतकी दक्षता घेतली तरी पुरे.

Web Title: Unique use of door mat in the car

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन