बी२बी इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर 'ईव्हीट्रिक कनेक्टचे' अनावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2021 08:35 PM2021-08-09T20:35:38+5:302021-08-09T20:36:17+5:30

Evitric Scooter: ईव्हीट्रिक मोटर्सची निर्मिती; एका चार्जिंगमध्ये ११० किमी रेंज

Unveiling of B2B electric delivery scooter 'Evitric Connect' | बी२बी इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर 'ईव्हीट्रिक कनेक्टचे' अनावरण

बी२बी इलेक्ट्रिक डिलिव्हरी स्कूटर 'ईव्हीट्रिक कनेक्टचे' अनावरण

Next

मुंबई : ईव्हीट्रिक मोटर्स ह्या इलेक्ट्रीक वाहन क्षेत्रातील नवीन व्हेंचरने नवी दिल्लीतील प्रगती मैदान येथे ईव्ही एक्स्पो २०२१ मध्ये लो स्पीड प्रकारातील आपल्या बी२बी ई- डिलिव्हरी स्कूटर 'ईव्हीट्रिक कनेक्टचे' सादरीकरण केले. हा कार्यक्रम ई- मोबिलिटी मिशनमध्ये योगदान देणा-या उद्योगातील घटकांसाठी होता व ह्या कार्यक्रमामध्ये ह्या ब्रँडने मोठ्या संख्येतील ऑटोमोबाईल शौकीन आणि उद्योगातील नेतृत्वाचे लक्ष आकर्षित करून घेतले.

ताशी २५ किमी ह्या गतीसह ह्या स्कूटरमध्ये बिजनेसेससाठी स्थानिक डिलिव्हरीच्या उद्दिष्टाची पूर्तता केली जाईल. त्यामध्ये १२ इंच ट्युबलेस टायर्स आणि १५० किलो इतक्या वजनाची क्षमता आहे. तिचे चार्जिंग होण्यास सुमारे साडेतीन तास लागतात. दोन स्वॅप करता येऊ शकणा-या लिथियम बॅटरीच्या पर्यायांसह एका चार्जिंगमध्ये ही स्कूटर ११० किमी अंतर जाऊ शकते व त्यामुळे ह्या सेग्मेंटची गरज लक्षात घेता तिला वारंवार चार्ज करावे लागत नाही.  

ईव्हीट्रिक मोटर्सचे एमडी व संस्थापक श्री मनोज पाटील ह्यांनी म्हंटले, “आम्ही एक दशकाहून अधिक काळापासून ऑटोमेशनच्या क्षेत्रात आहोत. सध्या चालू असलेल्या ई- मोबिलिटी मिशनमध्ये योगदान देणे ही ह्यामागची कल्पना आहे. ईव्हीट्रिक मोटर्सची संपूर्ण टीम गुणवत्तेला जोपासत ह्या उद्देशाची पूर्तता करणा-या विविध उत्पादनांना सादर करण्यासाठी मोठी मेहनत करत आहे. कंबशन इंजिन उत्पादनांच्या दर्जासारखा दर्जा ईव्हीजचा नसतो, असा लोकांचा समज आहे. ह्या गैरसमजामुळे हा उद्योग अद्याप मागे आहे. तसेच, मार्केटमध्ये मोठ्या संख्येत असलेल्या उत्पादनांमध्ये लोकलायजेशन ह्या घटकाचा अभाव आढळतो. आधीच ह्या आव्हानांवर मात करून ईव्हीट्रिक मोटर्सने मार्केटमध्ये प्रवेश केला आहे. आता ग्राहक स्थानिक पातळीवर बनवले गेलेल्या गुणवत्तापूर्ण इलेक्ट्रीक टूव्हीलर्सचा आनंद घेतील व त्यामधील फरकाचा स्वत: अनुभव घेतील.”

ह्या ब्रँडने आधीच डीलर्सना सहभागी करणे सुरू केले आहे व आरंभिक विस्तार योजनेचा भाग म्हणून २०२१-२२ च्या शेवटपर्यंत महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, आंध्र, तेलंगणा, केरला, कर्नाटका, दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, ओदिशा व पश्चिम बंगाल इथे आपली उपस्थिती बळकट करण्याचा ब्रँडचा निर्धार आहे.

Web Title: Unveiling of B2B electric delivery scooter 'Evitric Connect'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.