ही असेल Royal Enfield ची सर्वात महागडी बाईक! लॉन्च होण्यापूर्वीच दिसली रस्त्यावर, मिळतील खास फीचर्स

By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2022 04:10 PM2022-09-08T16:10:52+5:302022-09-08T16:11:24+5:30

Royal Enfield Super Meteor 650: ही बाईक कदाचित 2022 च्याअखेरपर्यंत अथवा 2023च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते.

Upcoming Bike Royal enfield super meteor 650 final model spotted ahead of launch | ही असेल Royal Enfield ची सर्वात महागडी बाईक! लॉन्च होण्यापूर्वीच दिसली रस्त्यावर, मिळतील खास फीचर्स

ही असेल Royal Enfield ची सर्वात महागडी बाईक! लॉन्च होण्यापूर्वीच दिसली रस्त्यावर, मिळतील खास फीचर्स

googlenewsNext

रॉयल एनफील्ड भारतमध्ये लवकरच सुपर मेटेओर 650 (Royal Enfield Super Meteor 650) लॉन्च करू शकते. ही बाईक कदाचित 2022 च्याअखेरपर्यंत अथवा 2023च्या सुरुवातीला लॉन्च होऊ शकते. मात्र या बाईकची अधिकृत लॉन्चिंग डेट आणि माहितीची खुलासा अद्याप होणे बाकी आहे. नुकतीच सुपर मेटेओर 650 आपल्या फायनल प्रोडक्शन अवतारात दिसून आली आहे. यामुळे हिच्या डिझाइनसंदर्भात बरीच माहिती मिळाली आहे. हिच्या टेस्ट म्यूलमध्ये रेट्रो-स्टाईल राउंड हेडलॅम्प दिसून आले आहेत. यावर नॉन-अॅडजस्टेबल मोठी विंडशील्ड लावलेली होती.

या बाईकला क्रॅश गार्ड, रोड बायस्ड टायर, अलॉय व्हील, फॉरवर्ड फूटपेग्स, लो स्लंग, फॅटर रीअर फेंडर्स, राउंड टेललॅम्प्स आणि टर्न इंडिकेटर्स आणि ट्विन पाईप एक्झॉस्ट सिस्टीम देण्यात आली आहे. याशिवाय, यापूर्वी समोर आलेल्या स्पाई फोटोजवरून कंपनी बाईकसोबत अनेक टूरिंग-अनुकूल अॅक्सेसरीज ऑफर करणार असल्याचे दिसून आले होते. या बाईकच्या डाव्याबाजूला हार्ड केस पॅनियर असेल. यात मागे बसणाऱ्यांसाठी फ्लॅट फुटरेस्ट, ऑक्झिलरी लाईट असलेले इंजिन गार्ड, टेल रॅकवर टॉप बॉक्स आणि लांब विंडस्क्रीन असेल.

आरई मेटेओर 350 प्रमाणेच रॉयल एनफील्ड मेटेओर 650 ला सेमी-डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळेल. ट्रिपर नेव्हिगेशनसाठी एक लहान पॅड देखील दिला जाऊ शखतो. नवीन RE 650 मोटरसायकल इंधन इंजेक्शन तंत्रज्ञानासह 648cc, पॅरलल ट्विन-सिलेंडर इंजिनद्वारे समर्थित असेल. हे तेच इंजिन आहे जे RE Interceptor 650 आणि Continental GT 650 वर उपलब्ध आहे. हे 47PS पॉवर आणि 52Nm टॉर्क जनरेट करते. क्रूझरला स्लिपर आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गिअरबॉक्स मिळण्याची शक्यता आहे. सस्पेन्शन सेटअपमध्ये समोर USD फोर्क्स आणि मागील बाजूस ट्विन शॉक शोषक मिळू शकतात.

नव्या आरई 650 मोटारसायकलमध्ये फ्यूल इंजेक्शन तंत्रज्ञानाचे 648cc, पॅरलल ट्विन-सिलेंडर इंजिन असेल. हेच इंजिन आरई इंटरसेप्टर 650 आणि कॉन्टिनेंटल जीटी 650 ला आहे. हे इंजिन 47PS पॉवर आणि 52Nm टार्क जनरेट करते. क्रुझरमध्ये स्लिपर आणि असिस्ट क्लचसह 6-स्पीड गियरबॉक्स मिळू शकतो. रॉयल एनफील्ड सुपर मेटेओर 650 कंपनीचे 650cc प्लॅटफॉर्मवर आधारित हे सर्वात महागडे मॉडेल असेल.

Web Title: Upcoming Bike Royal enfield super meteor 650 final model spotted ahead of launch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.