Upcoming Bikes: होंडापासून बजाजपर्यंत... मार्च महिन्यात लाँच होणार 'या' शानदार बाइक्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2023 11:07 AM2023-03-13T11:07:45+5:302023-03-13T11:08:16+5:30

Upcoming Motorcycles in India : या महिन्यात कोणत्या नवीन बाइक्स येत आहेत, याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

Upcoming Bikes: From Honda to Bajaj... these amazing bikes will be launched in the month of March! | Upcoming Bikes: होंडापासून बजाजपर्यंत... मार्च महिन्यात लाँच होणार 'या' शानदार बाइक्स!

Upcoming Bikes: होंडापासून बजाजपर्यंत... मार्च महिन्यात लाँच होणार 'या' शानदार बाइक्स!

googlenewsNext

नवी दिल्ली : जर तुम्ही स्वतःसाठी नवीन बाईक घेण्याचा विचार करत असाल तर थोडी वाट पाहणे फायदेशीर ठरेल. दरम्यान, या महिन्यात अनेक कंपन्या भारतीय मार्केटमध्ये ग्राहकांसाठी नवीन मॉडेल लॉन्च करणार आहेत. या महिन्यात कोणत्या नवीन बाइक्स येत आहेत, याची माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत.

Honda 100cc Bike
दरम्यान, 15 मार्च 2023 रोजी होंडा आपली नवीन 100 सीसी बाइक लॉन्च करणार आहे. आतापर्यंत, या बाइकशी संबंधित अधिक माहिती समोर आलेली नाही परंतु असे म्हटले जात आहे की, ही आगामी बाइक लॉन्च झाल्यानंतर HF Deluxe आणि Bajaj Platina व्यतिरिक्त Hero Splendor ला टक्कर देईल.

Bajaj Pulsar 220F
बजाज ऑटो लवकरच आपली नवीन बजाज पल्सर बाइक ग्राहकांसाठी लाँच करणार आहे. या बाइकचे बुकिंग निवडक डीलरशिपवर अनौपचारिकपणे सुरू करण्यात आले आहे. RDE उत्सर्जन मानदंड लक्षात घेऊन ही बाइक लॉन्च केली जाईल, असे अनेक मीडिया रिपोर्ट्समध्ये असे नमूद करण्यात आले आहे. 

Triumph Street Triple R, RS
Triumph Motorcycles देखील या आठवड्यात 15 मार्च 2023 रोजी भारतीय बाजारपेठेत ग्राहकांसाठी नवीन बाइक लॉन्च करणार आहे. मीडिया रिपोर्ट्समधून मिळालेल्या माहितीनुसार, या बाइकची डिलिव्हरी एप्रिल 2023 पासून सुरू होईल. नवीन Street Triple 765 मध्ये 765cc इनलाइन थ्री सिलिंडर इंजिन मिळू शकते, जे 128bhp पॉवर आणि 80Nm टॉर्क जनरेट करेल.

TVS iQube ST
टीव्हीएस मोटरने (TVS Motor) गेल्या वर्षी मार्चमध्ये ग्राहकांसाठी अपडेटेट iQube इलेक्ट्रिक स्कूटर सीरीज लॉन्च केली होती. परंतु सिरीजमधील iQube ST च्या टॉप व्हेरिएंटची किंमत जाहीर केलेली नाही. दरम्यान, कंपनी या महिन्यात ग्राहकांसाठी हे टॉप मॉडेल लॉन्च करू शकते, असे म्हटले जात आहे. तसेच, ड्रायव्हिंग रेंजबद्दल असा दावा करण्यात आला आहे की, ही स्कूटर पूर्ण चार्ज केल्यावर 145 किलोमीटरपर्यंत धावेल.

Web Title: Upcoming Bikes: From Honda to Bajaj... these amazing bikes will be launched in the month of March!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.