फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2022 06:13 PM2022-10-14T18:13:07+5:302022-10-14T18:15:02+5:30

अशात तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते.

upcoming cars 2023 auto expo Just 3 months of waiting, so many new cars coming in the market Including Maruti's new Baleno-Swift | फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश

फक्त 3 महिन्यांची प्रतिक्षा, बाजारात येणार एवढ्या साऱ्या नव्या कार! मारुतीच्या नव्या बलेनो-स्विफ्टचाही समावेश

googlenewsNext

देशातील सर्वात मोठा ऑटो शो अर्थात ऑटो एक्स्पो जानेवारी 2023 मध्ये सुरू होणार आहे. गेल्या वर्षी कोविड-19 महामारीमुळे हा शो आयोजित करण्यात आला नव्हता. 13 ते 18 जानेवारी दरम्यान हा शो आयोजित केला जाणार आहे. या शोमध्ये नवीन गाड्या लॉन्च होणार आहेत. यात टाटा मोटर्स, मारुती सुझुकी, टोयोटा, होंडा, एमजी, रेनॉल्टसह अनेक कंपन्या आपल्या कार लॉन्च करणार आहेत. विशेष म्हणजे यावेळी ऑटो शोमध्ये इलेक्ट्रिक कारचे अनेक मॉडेल्स बघायला मिळू शकतात. या शोमध्ये ओला आपली पहिली इलेक्ट्रिक कार देखील लॉन्च करू शकते. अशात तुम्ही नवीन कारचा विचार करत असाल तर जानेवारीपर्यंत थांबा. कदाचित तुमच्या ठरलेल्या बजेटमध्ये तुम्हाला आणखी चांगली कारही मिळू शकते.

ऑटो एक्सपो 2023 मध्ये मारुती सुझुकी -
मारुती सुझुकीसाठी दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ऑटो एक्स्पो एक मोठा इव्हेंट ठरणार आहे. यात कंपनी आपली मोस्ट अवेटेड ऑफरोड एसयूव्ही जिम्नी लॉन्च करू शकते. ही कार देशाच्या विविध भागांमध्ये टेस्टिंग दरम्यान स्पॉट झाली आहे. ही कार थेट महिंद्रा थार आणि फोर्स गुरखा यांना टक्कर देईल. याच बरोबर अपडेटेड बलेनो देखील लॉन्च होण्याची शक्यता आहे. ही बलेनो बेस्ड एक क्रॉसओव्हर कार असेल. या कारमध्ये स्लोपिंग रूफलाईन, अधिक अपराइट फ्रंट आणि अधिक ग्राउंड क्लिअरन्स बघायला मिळेल. तसेच, कंपनी अपडेटेड स्विफ्ट देखील लॉन्च करू शकते. 2023 स्विफ्टची नुकतीच युरोपात टेस्ट घेण्यात आली. यात नवे माइल्ड हायब्रीड इंजिन मिळू शकते.

ऑटो एक्सपो 2023 मध्ये टाटा मोटर्स आणि महिंद्रा
या शिवाय, या ऑटो एक्सपोमध्ये टाटा मोटर्सच्या नव्या हॅरियर आणि सफारी या दोन्ही SUV लॉन्च होऊ शकतात. याच बरोबर टाटा अपल्या नव्या इलेक्ट्रिक कार अल्ट्रोज EV आणि पंच EV वरूनही पडदा उठवू शकते. महिंद्रा संदर्भात बोलायचे झाल्यास, या एक्सोपत महिंद्रा आपली 5-डोअर थार लॉन्च करू शकते, असे मानले जात आहे. कारण कंपनीने तिची टेस्टिंग सुरू केली असल्याचे समजते. याच बरबोर कंपनी आपली मोस्ट पॉवरफुल SUV XUV700 चे इलेक्ट्रिक व्हर्जन XUV.e8 देखील लॉन्च करू शकते.

ऑटो एक्सपो 2023 मध्ये ह्युंदाई आणि टोयोटा -
ह्युंदाईसाठीही हा ऑटो एक्सपो जबरदस्त ठरणार आहे. यात कंपनी आपले मोस्ट पॉप्युलर आणि बेस्ट सेलिंग SUV क्रेटाचे फेसलिफ्ट मॉडेल सादर करू शकते. याच बरोबर ह्युंदाई आयोनिक 5, कोना इलेक्ट्रिक फेसलिफ्ट, न्यू जनरेशन कोना आणि न्यू मायक्रो SUV देखील आणण्याच्या तयारीत आहे. याच बरोबर, टोयोटा यावर्षीच नोव्हेंबरपर्यंत हायक्रॉस MPV सादर करणार होती. मात्र न्यू अपडेटनंतर, ही गाडी ऑटो एक्सपोमध्ये सादर करू शकते. ही पुढील वर्षी जानेवारी महिन्यात लॉन्च केली जाऊ शकते. याशिवाय कंपनी नेक्स्ट जनरेशन इनोव्हा आणि अर्बन क्रूझर फेसलिफ्ट देखील शोकेस करू शकते.

ऑटो एक्सपो 2023 मध्ये होंडा, एमजी आणि ओला -
भारतीय बाजारात होंडाचे मार्केट केवळ सेडानपर्यंतच मर्यादित दिसत आहे. तिच्या केवळ होंडा सिटी आणि होंडा अमेझलाच ग्राहकांची पसंती मिळत आहे. अशात कंपनी ऑटो एक्सपोमध्ये न्यू सब-फोर-मीटर SUV चे डेब्यू करू शकते. 2023 च्या मध्यापर्यंत ही SUV लॉन्च होऊ शकते. MG संदर्भात बोलायचे झाल्यास, ही कंपनी आपली एंट्री लेव्हल इलेक्ट्रिक कार लॉन्च करण्याच्या तयारीत आहे. माध्यमांतील वृत्तांनुसार, MG ची ही मिनी इलेक्ट्रिक (Mini Electric) कन्व्हर्टेबल कार असेल. याशिवाय या एक्स्पोमध्ये ओलाही आपल्या पहिल्या इलेक्ट्रिक कारवरून पडदा उठवू शकते. मात्र, कंपनी ही कार 2024 पर्यंत बाजारात लॉन्च करेल. कंपनीने 2026-27 पर्यंत 10 लाख इलेक्ट्रिक कारच्या विक्रीचे टारगेट ठेवले आहे.
 

Web Title: upcoming cars 2023 auto expo Just 3 months of waiting, so many new cars coming in the market Including Maruti's new Baleno-Swift

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.