Maruti Fronx पासून नवीन महिंद्रा थारपर्यंत, एप्रिलमध्ये 'या' कार लाँच होणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2023 01:14 PM2023-04-05T13:14:28+5:302023-04-05T13:15:07+5:30
Maruti Fronx, MG Comet EV, Citroen च्या नवीन एसयूव्ही आणि नवीन Mahindra Thar लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहेत.
नवी दिल्ली : एप्रिल महिन्यात भारतीय कार बाजारात काही शानदार कार लाँच होणार आहेत. या आगामी कारच्या यादीत महिंद्रा, मारुती सुझुकी, एमजी आणि सिट्रॉएन या मॉडेल्सचा समावेश असणार आहे. त्यामुळे तुमचा नवीन कार घेण्याचा विचार करत असेल तर या महिन्यानंतर तुमच्याकडे कार निवडण्यासाठी आणखी पर्याय असतील. Maruti Fronx, MG Comet EV, Citroen च्या नवीन एसयूव्ही आणि नवीन Mahindra Thar लवकरच भारतीय बाजारपेठेत लाँच होणार आहेत.
Maruti Suzuki Fronx
यावर्षी ऑटो एक्सपोमध्ये मारुती फ्रँक्स सादर करण्यात आली होती. आता ही कार डीलरशिपपर्यंत पोहोचली आहे. कंपनी लवकरच कारच्या किमती जाहीर करणार आहे. या कारचे एकूण 5 व्हेरियंटमध्ये लाँच केले जाऊ शकते. Fronx SUV दोन इंजिन पर्यायांसह सादर केली जाईल. यापैकी एक 1.0-लिटर 3- सिलिंडर टर्बो पेट्रोल बूस्टरजेट इंजिन असणार आहे. हे इंजिन 100hp पॉवर जनरेट करेल. दुसरे 1.2 लीटर 4-सिलिंडर नॅच्युरली एस्पिरेटेड इंजिन असणार आहे. हे 90hp पॉवर आणि 113Nm पीक टॉर्क जनरेट करेल. टर्बो इंजिनला 6-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सशी जोडले जाईल. नॅचरली एस्पिरेटेड इंजिनला 5-स्पीड मॅन्युअल आणि 5-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळणार आहे.
An SUV that’s designed to take on any challenge. Introducing FRONX – The latest SUV from Nexa.
— Nexa Experience (@NexaExperience) January 27, 2023
Bookings Open: Visit https://t.co/cij1px3wHF
Experience #TheShapeOfNew#FRONX#NewFaceOfSUVs#SportySUV#NEXA#CreateInspirepic.twitter.com/MIUTVWzq4k
MG Comet EV
ही एमजी इलेक्ट्रिक कार Wuling Air EV सारखी असणार आहे, जी आधीच जागतिक बाजारात आहे. या छोट्या कारची लांबी फक्त 2.9 मीटर असेल. डिझाईनबद्दल बोलायचे झाले तर कारला 3-डोर, 4-सीट्स मिळतील. त्यानुसार ही भारतातील सर्वात लहान चारचाकी वाहन असू शकते. या मिनी इलेक्ट्रिक कारमध्ये 20-25kWh चा बॅटरी पॅक दिला जाऊ शकतो. एकदा पूर्ण चार्ज केल्यानंतर ते 300 किलोमीटरपर्यंतची रेंज मिळवू शकते. कारची किंमत सुमारे 10 लाख रुपये (एक्स-शोरूम) असू शकते.
Citroen Aircross SUV
सिट्रॉएन लवकरच एक नवीन SUV लाँच करणार आहे, जी मारुती ग्रँड विटारा, टोयोटा हायरायडर सारख्या कारला टक्कर देईल. कंपनीच्या सध्याच्या हॅचबॅक Citroen C3 च्या धर्तीवर ही कार तयार करत आहे. मात्र, कारचा व्हीलबेस आणि लांबी जास्त असणार आहे.
Mahindra Thar
महिंद्रा आपल्या ऑफ-रोडर एसयूव्हीच्या नवीन बेस मॉडेलवर काम करत आहे. थारचा नवीन व्हेरिएंट AX AC या नावाने लाँच केला जाऊ शकतो. थारच्या सध्याच्या मॉडेल्सपेक्षा ही नवीन स्वस्त असणार आहे. मात्र, कमी किंमतीमुळे त्यात काही फीचर्स कमी असतील. नवीन थारमध्ये पेट्रोल आणि डिझेल या दोन्ही इंजिनांचा पर्याय असेल. यापैकी एक 2.2 लिटर डिझेल आणि दुसरे 2.0 लिटर पेट्रोल इंजिन असणार आहे.