Upcoming Cars: आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 04:20 PM2022-10-13T16:20:25+5:302022-10-13T16:25:19+5:30

Tata Motors Upcoming Cars: इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स शिवाय, कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडल्सचे सीएनजी व्हर्जनही आणणार आहे. यात अल्ट्रोज सीएनजी, पंच सीएनजी आणि नेक्सन सीएनजीचा समावेश असेल.

Upcoming Cars The real fight will happen now tata to launch brezza baleno cng rivals | Upcoming Cars: आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर

Upcoming Cars: आता होणार खरी फाइट! Tata आणणार दोन नव्या कार, Brezza आणि Baleno CNG ला देणार टक्कर

googlenewsNext

टाटा मोटर्सने (Tata Motors) भारतीय बाजारात कारचे अनेक नवे मॉडेल्स (ईव्ही आणि सीएनजी व्हर्जनसह) लॉन्च करण्याची योजना आखली आहे. लिथियम-आयन बॅटरी आणि BEV तंत्रज्ञानाच्या स्थानिक उत्पादनासाठी कंपनी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करणार आहे. इलेक्ट्रिक मोबिलिटी सोल्यूशन्स शिवाय, कंपनी आपल्या लोकप्रिय मॉडल्सचे सीएनजी व्हर्जनही आणणार आहे. यात अल्ट्रोज सीएनजी, पंच सीएनजी आणि नेक्सन सीएनजीचा समावेश असेल. Tata Altroz ​​​​CNG आणि Nexon CNG या पूर्वीच टेस्टिंग दरम्यान दिसून आली आहे.

Tata Altroz ​​​​CNG देणार Baleno CNG ला टक्कर -
मात्र, आद्याप कंपनीकडून मॉडलच्या लॉन्च टाइमलाइन संदर्भात कसल्याही प्रकारची माहिती देण्यात आलेली नाही. लॉन्चनंतर, Tata Altroz ​​​​CNG चा सामना लवकरच लॉन्च होणाऱ्या  Maruti Baleno CNG आणि Toytoa Glanza CNG सोबत असेल. हॅचबॅकमध्ये सीएनजी किटसह 1.2 लिटर टर्बो पेट्रोल इंजिन असेल. पेट्रोलवर ही कार 110bhp पॉवर आणि 140Nm टार्क जनरेट करण्यात सक्षम असू शकते. तसेच, ​​CNG वर ही थोडी कमी पॉवर आणि कमी टॉर्क जनरेट करेल.

टाटा नेक्सन सीएनजी मारुती ब्रेझा सीएनजीला देईल टक्कर -
टाटा नेक्सन सीएनजी थेट मारुती ब्रेझा सीएनजीला टक्कर देईल. ही कार 2023 मध्ये लॉन्च केली जाऊ शकते. या मॉडेलमध्ये 1.2 रेव्होट्रॉन टर्बो पेट्रोल इंजिनसह फॅक्ट्री फिटेड सीएनजी किट मिळू शकते. स्टँडर्ड मॉडेलमध्ये पेट्रोल युनिट 120bhp पॉवर आणि 170Nm टार्क जनरेट करते. Nexon CNG च्या रेग्युलर पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत, ही सीएनजीवर 15bhp कमी पॉवरफुल असू शकते. ही कार 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्ससह येऊ शकते. Tata Altroz ​​​​CNG आणि Nexon CNG, दोन्ही आपल्या स्टॅन्डर्ड पेट्रोल व्हर्जनच्या तुलनेत अधिक फ्यूअल एफिशिअन्ट असतील.

Web Title: Upcoming Cars The real fight will happen now tata to launch brezza baleno cng rivals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.