मारुती, टाटा, महिंद्रा, किया; या वर्षी लॉन्च होणार टॉप 10 इलेक्ट्रिक SUV, पाहा...
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2024 04:15 PM2024-01-11T16:15:58+5:302024-01-11T16:18:32+5:30
Upcoming Electric SUVs: इलेक्ट्रिक वाहनांची वाढती मागणी पाहता कंपन्या विविध इलेक्ट्रिक गाड्या लॉन्च करत आहेत.
Upcoming Electric SUVs In 2024: गेल्या काही वर्षांमध्ये देशात इलेक्ट्रिक वाहनांची मागणी झपाट्याने वाढत आहे. यामुळेच ऑटोमोबाईल कंपन्या आपल्या विविध विविध मॉडेल्सचे EV व्हर्जन लॉन्च करत आहे. इलेक्ट्रिक SUV ची वाढती मागणी पाहता या वर्षी, म्हणजे 2024 मध्ये सुमारे 10 इलेक्ट्रिक SUV लॉन्च होणार आहेत.
या इलेक्ट्रिक SUV लॉन्च केल्या जाऊ शकतात
-- Tata Punch EV
-- Maruti Suzuki eVX
-- Hyundai Creta EV
-- Mahindra Xuv300 EV
-- Mahindra XUV.e8
-- Tata Curvv EV
-- Tata Harrier & Safari EV
-- Kia EV9
-- Skoda Enyaq EV
-- Citroen C3 Aircross EV
या सर्व इलेक्ट्रिक एसयूव्ही या वर्षी लॉन्च केल्या जाऊ शकतात. यापैकी, टाटा पंच EV सर्वात आधी लॉन्च केली जाईल. टाटा मोटर्सने अधिकृतपणे नवीन पंच ईव्हीबाबत माहिती दिली आहे. ही जानेवारी-फेब्रुवारी 2024 मध्ये लॉन्च होण्याची अपेक्षा आहे. ग्राहक ऑनलाइन किंवा टाटा डीलरशिपमध्ये 21,000 रुपयांच्या टोकन मनीसह ही बुक करू शकतात. Tata Punch.EV एकूण 5 व्हेरिएंटमध्ये लॉन्च होईल. यात स्मार्ट, स्मार्ट प्लस, अॅडव्हेंचर, एम्पॉवर्ड आणि एम्पॉवर्ड प्लस आहे.
मारुती सुझुकीने आधीच जाहीर केले आहे की, ते या वर्षाच्या अखेरीस eVX इलेक्ट्रिक SUV लॉन्च करणार आहेत. सुझुकीच्या गुजरात प्लांटमध्ये ई-एसयूव्हीचे उत्पादन केले जाईल. युरोपसह अनेक आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतही याची निर्यात केली जाईल. ही पूर्णपणे नवीन स्केटबोर्ड प्लॅटफॉर्मवर आधारित असेल. Suzuki eVX दोन बॅटरी पर्यायांमध्ये येऊ शकते.