स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, MG आणतेय नवी इलेक्ट्रिक कार!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2022 12:48 PM2022-10-12T12:48:27+5:302022-10-12T12:49:29+5:30

तुम्हीही स्वस्त इलेक्ट्रिक कारची वाट पाहत असाल तर तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. टाटा टियागो इव्ही नुकतीच लॉन्च करण्यात आली आणि या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे.

upcoming mg compact ev unlikely to be cheaper than tiago ev know expected launch date in india | स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, MG आणतेय नवी इलेक्ट्रिक कार!

स्वस्त इलेक्ट्रिक कार खरेदीचं स्वप्न पूर्ण होणार, MG आणतेय नवी इलेक्ट्रिक कार!

Next

तुम्हीही स्वस्त इलेक्ट्रिक कारची वाट पाहत असाल तर तुमचं स्वप्न आता पूर्ण होणार आहे. टाटा टियागो इव्ही नुकतीच लॉन्च करण्यात आली आणि या कारची किंमत १० लाख रुपयांपेक्षा कमी आहे. आता MG मोटर्सही या सेगमेंटमध्ये आपली नवीन इलेक्ट्रिक कार घेऊन येत आहे. या कारची किंमत Tata Tiago EV च्या जवळपास असू शकते. MG च्या किफायतशीर आगामी इलेक्ट्रिक कारला MG Cite EV असं नाव दिलं जाऊ शकतं आणि जागतिक बाजारपेठेत पुढील वर्षाच्या सुरुवातीला ती लॉन्च केली जाऊ शकते.

२०२३ मध्ये कंपनी दोन इलेक्ट्रिक कार लॉन्च करू शकते. त्यापैकी एक सिटी EV कार असेल. ऑटोकार वेबसाइटने याआधीच याबाबतची माहिती दिली होती. एमजी लवकरच इलेक्ट्रिक कारच्या परवडणाऱ्या सेगमेंटमध्ये एक ईव्ही कार लॉन्च करेल आणि ती टू-डोअर असलेली ईव्ही असेल. ही कार Wuling Air EV वर आधारित असेल. Wuling Air EV कार इंडोनेशियामध्ये विक्रीसाठी उपलब्ध आहे. सध्या टाटा टियागो ईव्ही ही भारतीय बाजारपेठेतील सर्वात स्वस्त इलेक्ट्रिक कार आहे. 

कंपनीचा प्लान काय?
आम्ही सर्वात स्वस्त कार देण्यापेक्षा खूपच कमी किंमतीत सर्वोत्तम आणि नवीनतम तंत्रज्ञान देण्यावर विश्वास ठेवतो. आम्ही आमच्या स्वत:च्या विभागासाठी आणि लोकांसाठी खास ईव्ही कार तयार करण्यावर काम करत आहोत, असं एमजी मोटर्स इंडियाचे अध्यक्ष जीव चाबा यांनी एका मुलाखतीत म्हटलं होतं. 

Web Title: upcoming mg compact ev unlikely to be cheaper than tiago ev know expected launch date in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.