'टाटा' नाम तो सुना ही होगा! सज्ज व्हा येतेय Tata Blackbird SUV; लॉन्चआधीच फिचर्स लिक...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2022 05:41 PM2022-10-28T17:41:19+5:302022-10-28T17:42:19+5:30

टाटा मोटर्स एका नव्या कारवर काम करत आहे. ही एक SUV सेगमेंट कार असेल आणि Hyundai Creta आणि Kia Seltos या कारशी स्पर्धा करेल.

upcoming tata blackbird suv specification and features and price and competitors | 'टाटा' नाम तो सुना ही होगा! सज्ज व्हा येतेय Tata Blackbird SUV; लॉन्चआधीच फिचर्स लिक...

'टाटा' नाम तो सुना ही होगा! सज्ज व्हा येतेय Tata Blackbird SUV; लॉन्चआधीच फिचर्स लिक...

googlenewsNext

टाटा मोटर्स एका नव्या कारवर काम करत आहे. ही एक SUV सेगमेंट कार असेल आणि Hyundai Creta आणि Kia Seltos या कारशी स्पर्धा करेल. टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्ही असे या टाटाच्या आगामी कारचे नाव असणार आहे. टाटाची ही अत्याधुनिक कार टाटा नेक्सॉन आणि टाटा हॅरियरमध्ये फिट होईल. टाटाच्या या आगामी SUV कारमध्ये अनेक उत्तम फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स पाहायला मिळतील. टाटाच्या नेक्सॉन प्रमाणे ती जागतिक सुरक्षा रेटिंगमध्ये सर्वोत्तम गुण प्राप्त करू शकते. 

टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्हीच्या (Tata Blackbird SUV) डिझाईनबद्दल बोलायचं झालं तर या कारची लांबी ४.२ मीटर असू शकते. हे पहिलं AMP उत्पादन असेल, ज्याची लांबी ४००० AMP पेक्षा जास्त नसेल. तसंच ICE इंजिन असलेल्या कारला कमीत कमी GST भरावा लागेल. या कारचे डिझाईन टाटा नेक्सन आणि हॅरियर यांच्यापासून प्रेरित असल्याचं दिसून येत आहे. यामध्ये डीआरएलही पाहता येणार असून आकर्षक बंपर असणार आहे.

Tata Blackbird SUV चे संभाव्य इंटिरियर
समोर आलेल्या माहितीनुसार कारमध्ये फ्री स्टँडिंग टच स्क्रीन मिळेल. ते मध्यभागी सेट केले जाईल. यात टू स्पोक स्टिअरिंग व्हील मिळेल. याशिवाय सनरूफचाही त्यात समावेश करण्यात येणार आहे. १०-इंच इन्फोटेनमेंट सिस्टम कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोला सपोर्ट करेल. 

Tata Blackbird SUV चे संभाव्य इंजिन
Tata Blackbird SUV च्या इंजिनबद्दल माहिती समोर आली आहे की या कारला १.२ लीटर थ्री सिलेंडर टर्बो पेट्रोल इंजिन मिळेल, जे १३० bhp पावर आणि १७८ Nm टॉर्क जनरेट करू शकेल. याशिवाय, दुसरा इंजिन पर्याय १.५ लिटर चार सिलेंडर टर्बोचार्ज्ड डिझेल असेल. जो ११८ bhp पावर आणि २७० Nm टॉर्क जनरेट करू शकतो.

Tata Blackbird SUV ची इतर वैशिष्ट्ये
टाटा ब्लॅकबर्ड एसयूव्हीच्या वैशिष्ट्यांबद्दल सांगायचे तर कारमध्ये वायफाय असेल. वायरलेस चार्जर सपोर्ट असेल. सनरूफ आणि ऑटोमेटेड टेंपरेचर कंट्रोल अशी वैशिष्ट्ये देखील असतील. तसेच कूल्ड ग्लव बॉक्सही दिला जाईल. कंपनीकडून रियर व्ह्यू कॅमेरा देखील उपलब्ध असेल.

Web Title: upcoming tata blackbird suv specification and features and price and competitors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.