कार छोटी, सेफ्टी मोठी; मारुतीची 'हिट' गाडी येतेय नव्या रूपात

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2019 09:05 AM2019-04-25T09:05:14+5:302019-04-25T10:26:40+5:30

भारतामध्ये बीएस-6 नियमावली लागू करण्यात येणार आहे. तसेच एबीएस, एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सरसारखे फिचर्सही कारमध्ये बंधनकारक करण्यात आले आहेत.

Updated Maruti Alto 800, K10 will soon come; updated security | कार छोटी, सेफ्टी मोठी; मारुतीची 'हिट' गाडी येतेय नव्या रूपात

कार छोटी, सेफ्टी मोठी; मारुतीची 'हिट' गाडी येतेय नव्या रूपात

Next

नवी दिल्ली : देशात सुरक्षा नियमावलीमध्ये कठोरता आणल्याने मारुतीच्या काही कार या बंद होण्याची शक्यता होती. यामध्ये अल्टो, ओम्नी, के 10 या कारचा समावेश होता. मात्र, मारुतीची सर्वाधिक पसंतीची कार अल्टोमध्ये कंपनीने सुरक्षा नियमावलीनुसार बदल केल्याने ही कार नव्या उद्ययावत रुपात भारतीय रस्त्यांवर उतरणार आहे. 


भारतामध्ये बीएस-6 नियमावली लागू करण्यात येणार आहे. तसेच एबीएस, एअरबॅग, रिअर पार्किंग सेन्सरसारखे फिचर्सही कारमध्ये बंधनकारक करण्यात आले आहेत. यामुळे हे फिचर्स जर 2.3 लाखांपासून किंमत असलेल्या छोट्या कारमध्ये दिल्यास त्यांची किंमत वाढण्याची शक्यता होती. यामुळे कंपन्यांनी या कार बंद करण्याचा विचार सुरु केला होता. मात्र, मारुतीने अल्टो ही सर्वाधिक खपाची कार बंद करणे परवडणारे नव्हते. यामुळे कंपनी अल्टो आणि के 10 मध्ये सुरक्षा फिचर्स देण्याचा निर्णय घेतला. यानुसार के 10 आधीच लाँच केली आहे. आणि काही दिवसांत अल्टो 800 चे अपडेटेड व्हर्जन लाँच केले जाणार आहे. हे सुरक्षा नियमावली ऑक्टोबर 2019 पर्यंत कारमध्ये द्यावी लागणार आहे. 


कंपनीने या कारचे नवे व्हर्जन आणण्याचा निर्णय घेतला असला तरीही तिच्या रुपड्यामध्ये किंचित बदल केले आहेत. हेडलाईट बदलण्यात आली आहे. बंपरमधील ग्रील थोडी मोठी करण्यात आली आहे. तसेच इन्स्ट्रुमेंट क्लस्टरमध्ये सीटबेल्ट रिमाईंडर पाहायला मिळणार आहे. 


नवीन सुरक्षा प्रणालीमुळे जुन्या कारच्या तुलनेत अल्टो के 10 ची किंमत 3.66-4.45 लाख रुपये झाली आहे. किंमतीमध्ये 16515 ते 26946 रुपयांची वाढ झाली आहे.


सुरक्षा प्रणाली कोणत्या

अल्टो के 10 मध्ये एबीएससह ईबीडी, ड्रायव्हर-साईड एअरबॅग, रिव्हर्स पार्किंग सेन्सर, स्पीड अलर्ट सिस्टिमसोबत ड्रायव्हर आणि सहकाऱ्याला सीट बेल्ट रिमाईंडरसारखे सेफ्टी फिचर्स देण्यात आले आहेत. 

Web Title: Updated Maruti Alto 800, K10 will soon come; updated security

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.