Brezza ची हवा टाइट करायला येतेय Tata ची नवी SUV! असेल अधिक पॉवरफूल आणि फीचर लोडेड
By ऑनलाइन लोकमत | Published: April 3, 2023 05:12 PM2023-04-03T17:12:20+5:302023-04-03T17:15:56+5:30
अद्ययावत नेक्सॉन मॉडेलचे डिझाईन आणि स्टाईल टाटा कर्व्ह एसयूव्ही कूप कन्सेप्ट प्रमाणे असेल. जी आपण सर्वांनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये बघितली होती.
मारुती ब्रेझा आणि टाटा नेक्सॉन यांच्यात सब-4 मीटर एसयूव्ही सेगमेंटमध्ये जबरदस्त स्पर्धा असते. मात्र आता नवी अपडेटेड नेक्सॉन लॉन्च होत आहे. ही कार अधिक पॉवरफुल आणि अधिक फीचर लोडेड असेल. खरे तर, अपडेटेड टाटा नेक्सॉनच्या लॉन्च डेट संदर्भात अद्याप घोषणा झालेली नाही. पण, कॉम्पॅक्ट एसयूव्हीचे हे नवे मॉडेल ऑगस्ट 2023 पर्यंत विक्रीसाठी उपलब्ध होऊ शकते. तसेच जुलैपर्यंत ही सीरीज प्रोडक्शनमध्येही एंटर करू शकते.
अद्ययावत नेक्सॉन मॉडेलचे डिझाईन आणि स्टाईल टाटा कर्व्ह एसयूव्ही कूप कन्सेप्ट प्रमाणे असेल. जी आपण सर्वांनी 2023 ऑटो एक्सपोमध्ये बघितली होती. या कारमध्ये अधिकांश बदल फ्रंटला केले जातील. यात डायमंड शेप्ड इंसर्ट्ससह नव्या डिझाईनची ग्रील असेल. तसेच हिचे हेडलॅम्प्स काही प्रमाणात खालच्या बाजुला असती. या कारमध्ये सध्याच्या मॉडेलच्या तुलनेत अधिक अपराईट स्टान्स मिळतील. SUV मध्ये अलॉय व्हील्सचा नवा सेट मिळू शकतो. रिअर सेक्शनमध्येही काही प्रमाणावर बदल करण्यात येईल. टेलगेटवर एलईडी लाइट बार मिळेल, जे टेललॅम्प्सना जोडेल.
Tata Nexon 2023 फेसलिफ्टमध्ये नवे 10.25-इंचाचे टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टिम मिळण्याचीही शक्यता आहे. जे आपल्याला अपडेटेड हॅरिअर आणि सफारीमध्येही दुसून आले. तसेच इतर काही महत्वाच्या अपडेटमध्ये डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, मोठे सनरूफ, 360 डिग्री कॅमरा आणि कूल्ड सीट्सचा समावेश असू शकतो.
या शिवाय, या सबकॉम्पॅक्ट SUV ला अॅडव्हॉन्स्ड ड्रायव्हर असिस्टेंस सिस्टम (ADAS) सूटही दिला जाऊ शकतो, असा कयासही लावला जात आहे. जर असे झालेच, तर नवी नेक्सॉन ADAS तत्रज्ञानासह येणारी ही सेगमेन्टमधील पहिलीच कार असेल. तसेच, टाटा नेक्सन फेसलिफ्टला नवे 1.2L टर्बो पेट्रोल इंजिनसह आणले जाऊ शकते. जे 125bhp पॉवर आणि 225Nm टार्क जनरेट करू शकते. 1.5L डिझेल इंजिनही ऑफर केले जाऊ शकते.