फोर्ड मोटारीत अंतर्गत सजावटीमध्ये होणार बांबूचा वापर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2017 12:46 PM2017-09-25T12:46:21+5:302017-09-25T12:49:57+5:30

कारमध्ये इंटेरियर्समधील कामात बांबूचा वापर करता येऊ शकतो, प्लॅस्टिकबरोबर त्याचा वापर करणे शक्य व टिकावू ठरू शकते, असे फोर्ड मोटार कंपनीच्या चीनमधील संशोधन केंद्रात शोधले गेले आहे.

Use of bamboo will be made in the interior of the Ford motorcycle | फोर्ड मोटारीत अंतर्गत सजावटीमध्ये होणार बांबूचा वापर

फोर्ड मोटारीत अंतर्गत सजावटीमध्ये होणार बांबूचा वापर

Next
ठळक मुद्देअभियंते जेनेट यिन यांनी बांबू किती उपयुक्त व जादूई आहे, त्याचे वर्णन केले आहे. नैसर्गिकदृष्टीने उपयुक्त असणारा बांबू, पर्यावरणाला हानिकारक नाही, तो पुन्हा वापरता येतो किंवा तो नष्ट होऊ शकतो.

कारमध्ये इंटेरियर्समधील कामात बांबूचा वापर करता येऊ शकतो, प्लॅस्टिकबरोबर त्याचा वापर करणे शक्य व टिकावू ठरू शकते, असे फोर्ड मोटार कंपनीच्या चीनमधील संशोधन केंद्रात शोधले गेले आहे.

नैसर्गिक साधनांचा वापर करून पर्यावरणाचा ढासळता समतोल साधण्याचा प्रयत्न अनेक कंपन्या करीत असतात. आता अमेरिकेतील फोर्ड मोटार कंपनीनेही तसे काहीसे ठरवले आहे. चीनमधील नान्जिंग येथे फोर्डचे संशोधन केंद्र असून तेथील एक अभियंते जेनेट यिन यांनी बांबू किती उपयुक्त व जादूई आहे, त्याचे वर्णन केले आहे. नैसर्गिकदृष्टीने उपयुक्त असणारा बांबू, पर्यावरणाला हानिकारक नाही, तो पुन्हा वापरता येतो किंवा तो नष्ट होऊ शकतो, त्याचा पर्यावरणावर दुष्परिणाम होत नाही. 

बांबू हा आशियामध्ये अतिशय विपुल प्रमाणात असून चीनमध्ये बांबूचा मोठा वापर तर होतोच शिवाय जगामध्ये बांबूच्या निर्यातीतही चीन वरच्या क्रमांकावर आहे. वास्तविक भारतातही पुरातन काळापासून बांबूचा वापर होत आहे. उत्तर व इशान्य भारतात बांबूची मोठी लागवड व विकास कार्यक्रमही चालू आहे. मोचटार उद्योगामध्ये आतापर्यंत वापरण्यात येणाऱ्या अनेक बाबी या पर्यावरणाला हानिकारक असल्याचे स्पष्ट झाले आहे. अर्थात आधुनिक काळात पर्यावरणाला हानिकारक असे खनिज तेलापासून तयार केलेले इंधनही जगात सर्वत्र वापरले जात आहेच.

गेल्या काही वर्षांमध्ये तागाची सीट कव्हर्स तयार करण्यात आली असून त्याचा वापर बऱ्याच प्रमाणात भारतीय मोटारींमध्ये होऊ लागला आहे. आता बांबूचा करण्याच्या फोर्ड कंपनीच्या विचारामुळे एक नवा ट्रेंड येऊ शकेल, ती नक्कीच स्वागतार्ह बाब आहे. याआधी काही ठिकाणी जगामध्ये प्रयोग म्हणून अगदी बाह्य भागातही वापर करून गाड्या चालवल्या गेल्या आहेत, बांबूने सजवल्याही गेल्या आहेत. 

पण त्या कार वा गाड्या युनिक नाहीत तर प्रायोगिक आहेत. कारच्या अंतर्गत भागात म्हणजे इंटेरियरमध्ये बांबूचा वापर करता येऊ शकेल असे फोर्डच्या संशोधनात म्हटले असले तरी त्याचा वापर प्लॅस्टिकसह करण्यात येणार आहे व त्याद्वारे इंटेरियर चांगले बनवले जाईल, असे फोर्डचे म्हणणे आहे. अन्य कृत्रिम व नैसर्गिक फायबरच्या व साधनांच्या तुलनेत बांबू अधिक बळकट असल्याचे आढळून आले आहे. अर्थात हा बांबू नैसर्गिक दृष्टीने महत्त्वाचा आहेच पण त्यापासून विविध प्रकारच्या वस्तू बनवता येतात, हे भारतातही घरबांधणीमध्ये झालेल्या संशोधनात दिसून आले आहे. या बांबूच्या वापरातून तयार केलेल्या कारच्या अंतर्गत साधनांसाठी जेव्हा चाचणी झाली तेव्हा २१२ अंश सेल्सियसपर्यंत त्याला गरम वा तप्त करण्यात आले तेव्हाही बांबू परीक्षेत उतरला, असल्याचे फोर्डच्या नान्जिंग येथील संशोधन केंद्रात आढळून आले. 

या निमित्ताने प्लॅस्टिकबरोबर तो वापरता येऊ शकतो, तो बळकट व कारच्या अंतर्गत रचनेमधील कामात उपयुक्त ठरतो,हे स्पष्ट झाले आहे. वास्तविक भारतातही अनेक बाबतीत असे प्रयोग होत असतीलही कारण तागाचा वापर सीट कव्हरमध्ये केला गेला आहे, पूर्वी सीटसाठी काथ्याचाही वापर होत होता. भारतातही अशा प्रकारचे संशोधन दिसले नसले तरी काही ना काही प्रकारे कारमध्ये बांबूचा उपयोग आणखी चांगल्या प्रकारे केला गेला तर भारतातील बांबू उद्योगालाही चांगली बळकटी मिळू शकेल.

Web Title: Use of bamboo will be made in the interior of the Ford motorcycle

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Automobileवाहन