चढ- उतारावरील पार्किंगसाठी करा हॅण्डब्रेकचा वापर करा
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2017 08:00 AM2017-09-14T08:00:00+5:302017-09-14T08:00:00+5:30
हॅण्डब्रेक हा कारचा विविध कामांसाठी उपयुक्त असणारा घटक आहे. पार्किंगच्यावेळी हॅण्डब्रेक लावणे गरजेचे आहे. केवळ गीयरवर वा इंजिन बंद करून कार पार्क केली झाले असे होत नाही, त्यासाठी हॅण्डब्रेकचा वापर हवाच
कार वा वाहनांचा हॅण्डब्रेक हे एक अतिशय मोलाचे साधन आहे. कार चालवताना विविध वेळा त्याचा उपयोग होत असतो, हे खरे असले तरी केवळ कार चालवतानाच नव्हे तर पार्किंगच्यावेळीही हॅण्डब्रेक हा अतिशय महत्त्वाचा असतो. त्याची पार्किंगच्या कामातील भूमिका ही अतिशय मोलाची असते. कारच्या हॅण्डब्रेकचा पार्किंगच्यावेळी वापरच न करणारे अनेक जण आहेत. केवळ गीयरमध्ये कार ठेवून पार्किंग करणारे काही लोक कार जेव्हा टो केली जाते, तेव्हा त्या गीयरचे नुकसान झाल्याचे अनुभवतात, गीयर ही सातत्याने कार चालवताना वापर करण्याची बाब आहे. त्यामुळे गीयरही नीट राहिला पाहिजे.
कार पार्किंग करताना उतारावर करीत असाल व उतार तुमच्या समोरच्या बाजूला असेल तरी व उतार मागील बाजूला असेल तरी केवळ गीयरवर टाकून कार पार्क करू नका. त्यासाठी हॅण्डब्रेक लावा. हॅण्डब्रेक हा ड्रायव्हरच्या डाव्या बाजूला असतो. तो एका दट्ट्याद्वारे दिसून येतो.त्याच्या लीव्हरवर एक बटण असते ते आत अंगठ्याने दाबून पुश करून मग हॅण्डब्रेक खेचावा वा रिलीज करावा. या पद्धतीने न कलेयास हॅण्डब्रेक खऱाब होऊ शकतो. वाहन सपाट रस्त्यावरही पार्क केलेली असले तरी कारला हॅण्डब्रेक लावणे गरजेचे आहे.
कार उतारावर पार्क करताना पुढील बाजू उताराच्या दिशेने असेल म्हणजे ड्रायव्हरच्या तोंडासमोर उतार असेल तर कार पार्क करताना ती इंजिन बंद केल्यानंतर रिव्हर्स गीयरमध्ये टाकून व नंतर लगेच हॅण्डब्रेक खेचून घेऊन पार्क करा. त्यामुळे कार कोणत्याही स्थितीत पुढील बाजूला पुश देशील होणार नाही. उतारामध्ये मागील बाजूने उतार असेल तर कार पार्क करताना इंजिन बंद केल्यानंतर कार पहिल्या गीयरमध्ये टाकून हॅण्डब्रेक खेचून घेऊन पार्क करा. अशा प्रकारामुळे कार सुरक्षितपणे पार्क झाली असले असे निश्चित समजावे.
हॅण्डब्रेकचा पार्किंगमधील हा वापर अतिशय गरजेचा असतो. कधीही केवळ गीयरवर कार पार्क करू नये. त्यामुळे उतारावर असेल तर त्या गीयरवरही ताण येत असतो. तो ताण कमी करण्यासाठीही हॅण्डब्रेकचा वापर हा गरजेचा ठरतो. हॅण्डब्रेक लावून बराच काळही कार पार्क करू नये. तो नेहमी रिलीज करून गाडी थोडी पुढे मागे घेत राहावे. तसे केल्याने हॅण्डब्रेक वापरताही राहील व कार बराच काळ बंद असल्यास तो जामही होणार नाही. तो वापरता राहील. हॅण्ड ब्रेक हा कार चालवताना किती महत्त्वाचा व उपयुक्त असतो तो पुढील लेखामध्ये पाहू.