चांगल्या समाधानकारक अनुभवासाठी स्कूटरची निगा दररोजच राखायला हवी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2017 09:00 AM2017-08-25T09:00:00+5:302017-08-25T09:00:00+5:30

स्कूटर ही नित्यनेमाने वापरण्याची बाब आहे, तसे न केल्यास स्टार्ट करण्यापासून त्रास होतो व स्कूटर चालवण्याचा आनंद मिळण्याऐवजी कटकटी मागे लागतात.

use scooter regularly for satisfactory performance | चांगल्या समाधानकारक अनुभवासाठी स्कूटरची निगा दररोजच राखायला हवी

चांगल्या समाधानकारक अनुभवासाठी स्कूटरची निगा दररोजच राखायला हवी

ठळक मुद्देअनेकजण स्कूटरसोबत मिळालेले माहितीपत्रक नीट वाचतही नाहीतशहरामध्ये सिग्नलला उभे राहाल तेव्हा जास्त वेळ सिग्नल असेल असे वाटले तर स्कूटर बंद करापावसाळ्यात वा थंडीमध्ये बॅटरी डाऊन होण्याचे म्हणजे उतरण्याचे प्रकार घडतात.

सध्याच्या स्कूटर्स म्हणजे महिलांनाही चालवण्यासाठी खूप सुलभ आणि सोप्या व सोयीस्कर अशा आहेत. ऑटोगीयरच्या असल्याने हे सुलभपण त्यात आले आहे. तसेच त्या स्कूटरचे वजनही पेलण्यासारखे आहे, वजनाला काहीशा हलक्या करण्यात आलेल्या तर काही स्कूटर्सची बॉडी पत्र्याची आहे तर काहींची फायबर, प्लॅस्टिकची. शहरामध्ये दैनंदिन स्वरूपात या चालवल्या जातात तरीही अनेकांना त्या स्कूटरच्या वापरामध्ये काही ना काही अडचणी येत असतात. स्कूटर अशा प्रकारच्या सुलभ व उपयुक्त असल्या तरी चालवण्याची व वापरण्याची पद्धत हा स्कूटर्समध्ये येणाऱ्या अडचणी निर्माण करमारा भाग असतो. अनेकजण स्कूटरसोबत मिळालेले माहितीपत्रक नीट वाचतही नाहीत, त्यामुळे स्कूटरच्या स्टार्टिंगमध्ये त्रास होतो, मध्येच बंद बंद होण्याचा, ब्रेक नीट न लागण्याचा, लाइट वा साईड इंडिकेटर्सचा त्रास होतो. मुळात स्कूटर दररोज नियमित वापरा, ती पद्धतशीरपणे वापरा आणि काही प्राथमिक बाबी नीट समजून घ्या.
नित्यनेमाने व रोज स्कूटर वापरीत असला तरीही दिवसाच्या सुरुवातीला स्कूटर चालू करताना, पायाने किक मारून स्कूटर चालू करा, त्यावेळी काही क्षण स्कूटरला चोक द्या म्हणजे चोकचा दट्ट्या काही काही क्षण बाहेर खेचून टेवा. त्यानंतर चोकचा दट्ट्या आत ढकलून द्या. स्कूटर चालू करताना हेडलॅम्प स्विच ऑफ ठेवा. स्कूटर झटकन रेझ करू नका,एक्सलरेटर हा हळू हळू देत स्कूटरचा वेग वाढवा.य विशिष्ट वेगापेक्षा जास्त वेग ठेवू नका. स्कूटर सुरुवातीला स्टार्ट करण्यासाठी सांगितलेली ही प्रक्रिया तुमच्या स्कूटरच्या इंजिनाला नीटपणे अंतर्गत वंगणाने नीट करील, पेट्रोलचा फ्लो सुरळीत होण्यासाठी त्यामुळे मदत होईल. त्यामुळे तुम्हाल स्कूटरचे इंजिन हे अति फास्ट नाही ना, याचीही कल्पना येईल. नंतर दिवसभरात स्कूटर मध्येच बंद पडणार नाही.
शहरामध्ये सिग्नलला उभे राहाल तेव्हा जास्त वेळ सिग्नल असेल असे वाटले तर स्कूटर बंद करा व सिग्नल हिरवा लागताना ती बटन स्टार्ट करून चालवण्यास सुरुवात करा. शक्य असेल तेथे बटण स्टार्टऐवजी कीकने स्टार्ट करण्याची सवय जोपासा. त्यामुळे कीकने स्कूटर स्टार्ट करण्यासाठी त्या प्रणालीचाही नीटपणे नियमित वापर राहील. काहीवेळा कीकचा वापर न केल्याने कीक मारण्यासाठी गरज लागते तेव्हा कीकने स्कूटर चालू होत नाही, कधी कीक घट्ट राहाते, तर कीक मारण्याची सवयही राहात नाही. 
काहीवेळा बॅटरी डाऊन होते, अशावेळी कीकने स्कूटर स्टार्ट करावी लागते, त्यानंतर स्कूटर चालवतो, तेव्हा ती बॅटरी चार्ज होते. पावसाळ्यात वा थंडीमध्ये बॅटरी डाऊन होण्याचे म्हणजे उतरण्याचे प्रकार घडतात. बॅटरीचे साधारण आयुष्य लक्षात घेऊन बॅटरी वेळेवर तपासा, तसेच वेळेवर बदला. बॅटरी डाऊन झाली तर हबटनाने स्टार्ट होत नाही, त्या कामासाठी आवश्यक ऊर्जा मिळ शकत नाही. २ ते ३ वर्षांपेक्षा बॅटरी टिकत नाही, त्यामुळे बॅटरी कधी लावली आहे, ती कधी संपणार आहे याचाही अंदाज घ्या. नियमितपणे स्कूटर वापरल्याने अनेक बाबी लक्षात येतात, त्यामुळे स्कूटर स्टार्ट करताना अडचण जाणवत नाही, स्कूटरला मध्ये बंद पडण्याचाही विनाकारम त्रास होत नाही, कारण पेट्रोलचा फ्लो हा नीटपणे मिळत असतो. अनेक दिवस स्कूटर न चालवता उभी करणे, कधीतरी स्कूटर चालवणे व त्यानंतर बटण स्टार्ट करून पाहणे, यामुळे बॅटरी डाऊन होणे, दमटपणाने स्कूटर चालू न होण्याचा प्रकार होणे, आदी कटकटींना तोंड द्यावे लागते. यासाठी स्कूटरचा वापर नियमित असणे हे अतिशय गरजेचे आहे. फार नाही पण किमान दिवसातून एक छोटी फेरी तरी स्कूटरला घडवावी, त्यमुळे तुम्हा गरज पडली तरी ती सुरू होण्यात व नीटपणे तिचे कार्य होण्यामध्ये त्रास होणार नाही.

Web Title: use scooter regularly for satisfactory performance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.