कारमध्ये संगीताचा वापर सुमधूर वाटावा कर्णकर्कश्श नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2017 05:00 PM2017-09-02T17:00:00+5:302017-09-02T17:00:00+5:30

कारमधील म्युझिक सिस्टिमचा वापर हा दुसऱ्यांना त्रास होण्यासाठी करू नये, तसेच कार चालवताना किमान मागील वाहनाचा हॉर्न तरी ऐकू यावा इतकाच आवाज ठेवावा, त्यामुळे तुम्ही तुमचीच सुरक्षा जोपासत असता.

use your car music system softly and in low volume | कारमध्ये संगीताचा वापर सुमधूर वाटावा कर्णकर्कश्श नाही

कारमध्ये संगीताचा वापर सुमधूर वाटावा कर्णकर्कश्श नाही

Next
ठळक मुद्देकारमध्ये म्युझिक सिस्टिम बसवल्याविना कोणत्याही कारला पूर्णत्त्व येत नाही८०० रुपय़ांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत म्युझिक सिस्टिम लावणारे शौकिन आहेतकार चालवतानाही तुमच्या या म्युझिक सिस्टिमचा आवाज हा तुमच्या कार चालवण्याच्या कामात अडथळा ठरू नये

कारमध्ये म्युझिक सिस्टिम बसवल्याविना कोणत्याही कारला पूर्णत्त्व येत नाही, अशी सध्याच्या ग्राहकांची मानसिकता आहे. अगदी ८०० रुपय़ांपासून ते ५० हजार रुपयांपर्यंत म्युझिक सिस्टिम लावणारे शौकिन आहेत. या म्युझिक म्युझिक सिस्टिममधून ध्वनिवर्धन होण्यासाठीही विविध प्रकारचे, विविध प्रकारच्या दर्जाचे स्पीकर्स मिळत असतात. तसेच ट्वीटर्स हा प्रकारही त्यामध्ये लावला जातो. आवाजातील विविध पद्धतीचे बारकावे तुमच्या कानापर्यंत पोहोचवणारे हे स्पीकर्स व म्युझिक सिस्टिम ही नेमकी कशासाठी असते, याचा विचार मात्र अनेकजण करीत नाहीत.

आपल्या कामध्ये बसवलेल्या या म्युझिक सिस्टिमचा उपभोग काहींना अन्य लोकांनीही घ्यावा असे वाटत असते व अगदी कर्णकर्कश्श आवाजात कारमध्ये या म्युझिक सिस्टिमवर आपल्या ला आवडणारी गाणी, वाद्यसंगीत लावले जाते.कार चालू असो वा बंद असो, ट्रीपला गेल्यानंतर कार थांबल्यानंतरही भर रस्त्यावर वा रस्त्याच्या बाजूला मोठमोठ्या आवाजात या म्युझिक सिस्टिमचा वापर करणारे नागरिक आहेत, ही अतिशय क्लेशदायक स्थिती आहे.

शहराबाहेर गेल्यानंतर जंगलात वा पिकनिक स्पॉटला अशा प्रकारे कर्णकर्कश्श ध्वनिवर्धकाद्वारे घातला झाणारा कार्यक्रम हा धिंगाणा असतो. जंगलात तर यामुळे पशू-पक्षी हे देखील अशा आवाजाने बिथरतात, गावांमध्ये आपल्या या वागण्याने लोकांना त्रास होतो, शरम वाटते, इतकेच नव्हे तर तुमचे वर्तन हे असे असल्याने ते आपण करू शकत नाही, असेही काहींना वाटते. तेव्हा ते व्रतन नीट सुधारणे गरजेचे आहेच. कार चालवतानाही तुमच्या या म्युझिक सिस्टिमचा आवाज हा तुमच्या कार चालवण्याच्या कामात अडथळा ठरू नये. मागून येणाऱ्या वाहनाने हॉर्न वाजवला तर तो ऐकायला यावा इतकाच आवाज तुम्ही म्युझिक सिस्टिमचा ठेवला तर ठीक आहे, अन्यथा अशा वागण्याने एखादी दुर्घटनाही होऊ शकते व त्यावेळी सर्वस्वी तुम्हीच त्याला जबाबदार असता, हे लक्षात असूद्या.

Web Title: use your car music system softly and in low volume

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.