Used car : जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन असेल तर 'या' गोष्टी लक्षात ठेवा, अन्यथा...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2022 06:26 PM2022-12-16T18:26:58+5:302022-12-16T18:27:24+5:30
Used car : जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो.
नवी दिल्ली : भारतीय ऑटो मार्केटमध्ये सतत नवनवीन कार येत असतात. यापैकी काहींच्या किमती खूप असतात. यातच आता नवीन वर्षात सर्व कार महाग होणार आहेत. काहीजण नवीन कार महाग असल्याने जुनी कार खरेदी करण्यावर भर देतात. जर तुम्हीही जुनी कार खरेदी करण्याचा प्लॅन करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवा नाहीतर अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. तसेच, काही गोष्टींकडे लक्ष न दिल्याने तुम्हाला आर्थिक फटका बसू शकतो.
'या' गोष्टी लक्षात ठेवा
1) कोणत्याही वाहनासाठी इंजिन गरजेचे असते.त्यामुळे तुम्ही जुनी कार खरेदी करत असाल तर सर्वात अगोदर इंजिन तपासा. जर तुमच्या सोबत एक मेकॅनिक असेल तर उत्तमच. इंजिन न पाहताच कार घेतली तर तुम्हाला फटका बसू शकतो.
2) तसेच त्या कारचे इंजिन ऑइल व्यवस्थित तपासा. ऑइलशिवाय गाडी चालवले तर इंजिन खराब होऊ शकते. त्यामुळे तुम्हाला आर्थिक तोटा सहन करावा लागेल.
3) जुन्या कारची कागदपत्रे म्हणजेच आरसी, पीओसी आणि विमा यांसारखी कागदपत्रे नीट चेक करा. त्याशिवाय 15 वर्षांपेक्षा जुनी असलेली कार खरेदी करू नका. नाहीतर तुमचे चलन कापले जाईल.
4) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ती कार तुटली किंवा तिची लाईट यांसारख्या गोष्टी पहा. जर यामध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्याचे पैसे कमी करून घ्या.